शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरात छापा; बनावट नोटा जप्त तिघांविरुद्ध गुन्हा : कारसह पाच लाखांचा गुटखा पकडला

By राजकुमार जोंधळे | Updated: March 26, 2025 22:27 IST

या कारवाईने खळबळ उडाली असून, याबाबत अहमदपूर ठाण्यात तिघांविराेधात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

अहमदपूर (जि. लातूर) : अंबाजाेगाई राेडवरील एका लाॅजनजीक टाकलेल्या छाप्यात बनावट नाेटा, गुटखा आणि कार असा ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने खळबळ उडाली असून, याबाबत अहमदपूर ठाण्यात तिघांविराेधात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश दिले आहेत. डीवायएसपी मनिष कल्याणकर, सहायक पाेलिस अधीक्षक सागर खर्डे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. रात्री पथक गस्तीवर असताना खबऱ्याने माहिती दिली. याच्या आधारे सकाळी ७ वाजता अहमदपूर शहरातील क्रांती चौकात चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री, वाहतूक केली जाताना छापा मारला. यावेळी कारसह (एम.एच १२ एल.पी. ५७५०) तब्बल २ लाख ९२ हजार १०० रूपयांच्या मुद्देमाल जप्त केला. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात अल्लाबक्ष इलाही तांबोळी (वय ३१ रा. अहमदपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बनावट नाेटा चलनात आणताना पथकाची धाड...अहमदपूर येथील एका लॉजनजीक दोघे बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती मिळाली. पाेलिस पथकाने सायंकाळी ७:५० वाजता सापळा रचून धाड टाकली. यावेळी ५००, २०० आणि १०० रूपयांच्या १२ हजार ७०० रुपये किंमतीच्या बनावट नोटांसह जुने मोबाईल, वाहनासह (एम.एच २४ व्ही. ४८४७) एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अहमदपूर ठाण्यात मिर्झा शोएब बेग मिर्झा अन्वर बेग (वय २९) व एक अल्पवयीन मुलगा (दाेघेही रा. हिंगोली नाका, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक केली आहे.

एका महिन्यात सव्वा काेटींचा मुद्देमाल जप्त...सहायक पाेलिस अधीक्षक सागर खर्डे यांनी आठवडाभरात अवैध व्यवसायावर माेठ्या प्रमाणावर कारवाई केली असून, जवळपास एक महिन्यात अवैद्य वाळू, गुटख्यावर धाडी टाकल्या आहेत. त्यांनी केलेल्या कारवाईत सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत.