शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल झावरे यांचा सभापतीपदाचा राजीनामा; विजय औटी यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 16:46 IST

पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आमदार विजय औटी यांच्यावर टीका केली. झावरे यांचा राजीनामा औटी यांना मोठा धक्का समजला जातो. 

पारनेर : पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आमदार विजय औटी यांच्यावर टीका केली. झावरे यांचा राजीनामा औटी यांना मोठा धक्का समजला जातो. राहुल झावरे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे सुपुत्र आहेत. मागील तीनही विधानसभा निवडणुकीत नंदकुमार झावरे गटाने विजय औटी यांना साथ दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनी त्यांच्या प्रचारात किंवा प्रचार पत्रकावर स्व.बाळासाहेब विखे, नंदकुमार झावरे यांचा कुठेही उल्लेख केला नाही व फोटोही टाकले नाहीत. त्यामुळे झावरे समर्थक नाराज होते. मंगळवारी सकाळी पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. ज्यांनी नंदकुमार झावरे यांचा नामोल्लेख टाळला त्यांचे मी नावही घेणार नाही. पण त्यांच्यावर माझे वडील, माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी सातत्याने प्रेम केले. तेच राजकीय वारसदार झावरे यांचा इतिहास संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे आमच्या कुटुंबाला वेदना झाल्याचे राहुल झावरे यांनी सांगितले. आमच्या मनातील वेदना गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे यांना कळविले आहेत. त्या कुटुंबाचे गेली तीन-चार महिने खूप कठीण काळातून गेले आहेत. त्यामुळे त्यांना या भूमिकेत कोणीही ओढू नये, असेही झावरे यांनी सांगितले.माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या कान्हुरपठार ग्रामपंचायतीमधील गैरप्रकाराबाबत अनुपालन ठराव करण्यास खासदार सुजय विखे यांनी सांगूनही औटी यांनी विरोध केला होता. स्वत:च्या निवडणुकीत रात्रीतून चार सदस्यांचा सह्या घेऊन ठराव तयार केला. मग सुजय विखे यांच्या निवडणुकीवेळी तो ठराव का दिला नाही? असा आरोप सभापती झावरे यांनी करून आझाद ठुबे व आमच्यात वैर नसल्याचे सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019