शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

मुळा ८४ तर निळवंडे ६० टक्के भरले

By admin | Updated: August 4, 2016 23:51 IST

राजूर/राहुरी : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा ठरलेल्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी १० हजार ५०० दशलक्ष घनफूट इतका झाला

राजूर/राहुरी : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा ठरलेल्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी १० हजार ५०० दशलक्ष घनफूट इतका झाला आणि धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, सहाय्यक अभियंता गोरक्षनाथ थोरात यांनी जाहीर केले. दरम्यान गुरुवारी धरणाच्या पाणलोटातील पाऊस एकदम कमी झाला. त्यामुळे धरणात येणाऱ्या नवीन पाण्याची आवकही मंदावली. मुळा धरणही ८५ टक्के भरले असून तेही भरण्याच्या मार्गावर आहे. २३ जूनपर्यंत धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला होता. ४ जुलैपासून धरण पाणलोटात मान्सून सक्रिय झाला आणि ११ जुलैपर्यंत पाणी साठ्यातही झपाट्याने वाढ होऊ लागली. यावेळी धरणातील पाणी साठा ४ हजार ६७३ दशलक्ष घनफूट इतका झाला. मात्र यानंतर पुन्हा भंडारदरा धरण यावर्षी १५ आॅगस्टपूर्वी भरणार की नाही याबाबत मतमतांतरे व्यक्त होऊ लागली. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पुन्हा पाणलोटात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. याच काळात या परिसराला दुसऱ्यांदा अतिवृष्टीचा तडाखा बसला. पाणलोटातील रतनवाडी येथे २४ तासात तब्बल ४८४ मिमी विक्रमी पाऊस झाला आणि दोन दिवसात धरणात दोन टीएमसीहून अधिक पाणी आले. एक आॅगस्ट ते चार आॅगस्ट सकाळपर्यंतच्या साडेतीन दिवसात धरणात ३ हजार ३६४ दशलक्ष घनफूट पाणी नव्याने येत ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात गुरुवारी सकाळी १० नंतर १० हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आणि धरण भरण्याची उत्सुकता संपली. जलसंपदा विभागाने धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर केले. धरणातून सध्या वीज निर्मितीसाठी ८२३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सहाय्यक अभियंता गोरक्षनाथ थोरात, शाखा अभियंता पी.डी. पाटील, कर्मचारी प्रकाश चव्हाण, वसंत भालेराव, टी.एस. वसईकर, बाळू लोहगावकर, दत्तू पाबळकर धरणस्थळावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. निळवंडे धरणातील पाणी साठ्याने गुरुवारी सकाळी सहा वाजता ६० टक्क्याचा टप्पा ओलांडला आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर ओसरल्यामुळे आवक घटली आहे़ आवक वाढल्यास पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल़ पाणी सोडायचे की, नाही याचा निर्णय पाण्याची आवक पाहून घेतला जाईल़ २२ हजार ९६६ दलघफू पाणी साठ्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल़ -दिलीप नवलाखे, उपअभियंता -शामराव बुधवंत, शाखा अभियंता आडणदरा परिसरात बंधारा फुटला बोटा : पुरामुळे पठारभागातील भोजदरी येथील आडणदरा परिसरात असलेल्या माती बंधाऱ्याला भगदाड पडले़ त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी परिसरातील शेतात घुसल्याने नुकसान झाले आहे़ कृषी विभागाने आडणदरा परिसरात बंधारा बांधला़ परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उतरावे हा हेतू त्या मागचा होता़ बुधवारी आलेल्या पुरामुळे बंधाऱ्याच्या मधोमध भरावाला भगदाड पडले़ बंधारा फुटल्याने पाणी बाबुराव अमृता हांडे व विकास हांडे यांच्या शेतात गेले़ शेतातील भुईमूग व बाजरी या पिकांचे नुकसान झाले. मुळा धरणात २२ टीएमसी पाणी साठा राहुरी : मुळा धरण गुरूवारी सायंकाळी ५ वाजता ८४ टक्के भरले़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २१ हजार ६०२ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली़ मुळा धरणाकडे पाण्याची आवक १२ हजार ७३१ क्युसेकने सुरू आहे़ गुरूवारी पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर ओसरला़ पाण्याची आवक वाढल्यास जलसंपदा विभाग मुळा धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष धरणाच्या पाणी पातळीकडे लागले आहे़ आॅगस्ट महिन्यात २२ हजार ९६६ दशलक्ष घनफूट पाणी साठा जमा झाल्यास नदी पात्रात पाणी सोडले जाते़ बुधवारी रात्री पाण्याची आवक ४१ हजार क्युसेक होती़ गुरूवारी सकाळी आवक २१ हजार क्युसेकवर व दुपारनंतर १२ हजारापर्यंत खाली घसरली़ भंडारदरा ओव्हरफ्लो! पर्यटकांचा ओघ सुरू भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा, हरिश्चंद्रगड, रतनवाडी या परिसरात पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. परिसरातील डोंगरदऱ्या, धबधबे पाहण्यासाठी नागरिक येथे मोठ्या संख्येने येत आहेत. घोड धरण ओव्हरफ्लो श्रीगोंदा : श्रीगोंदा, कर्जत व शिरूर तालुक्यातील ६३ गावांना वरदान ठरणारे घोड नदीवरील घोड धरण गुरुवारी पहाटे ओव्हरफ्लो झाले. धरणावरून नदी पात्रात २६ हजार ४०० क्युसेकने पाणी सोडले. गुरूवारी सकाळी घोड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. प्रशासनाने भीमा व घोड नदी काठावरील गावांना सावधगिरीचा इशारा दिला. पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन ओव्हरफ्लोचे पाणी कुकडी, घोड कालव्यातून सोडण्याचा निर्णय झाला. त्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी कालव्यास पाणी सोडले होते. बैठकीस आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आदी उपस्थित होते. घोड धरण गेल्या वर्षी फक्त ५५ टक्के भरले होते. त्यामुळे घोड पट्ट्याची वाळवंटमय परिस्थिती झाली होती. मात्र यंदा घोड धरण ओव्हरफ्लो झाले आणि नदीतून २६ हजार ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. नेत्यांची वाट न पाहता जलाशय व नदीची खणानारळाने ओटी भरण्याचा आनंद नागरिकांनी लुटला. घोड धरणात ४ हजार ४०० एमसीएफटी (८४ टक्के) पाणी अडविले आहे. कुकडी प्रकल्पात २७ टी एम सी पाणी कुकडी प्रकल्पातील येडगाव, वडज, चिलेवाडी ही धरणे ओसांडून वाहत आहेत. डिंबे धरणात १० टीएमसी (८० टक्के) पाणी आले आहे. हे धरण दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. माणिकडोह धरणात ५ टीएमसी (५० टकके) पाणी आले आहे. तर पिंपळगाव जोगे धरणात अडीच टीएमसी ( ६३ टक्के) पाणी आले आहे. त्यामुळे पिंपळगाव जोगे धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे घोड धरण लाभक्षेत्रात जल्लोष घोड धरण पहाटे ओव्हरफ्लो झाले आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. काष्टी येथील राहुल जगताप, उपसरपंच दिलीप दरेकर, गणेश डोईफोडे, चंद्रशेखर मोरे यांनी धरणावर जलपूजन केले. घोड ३५ वेळा ओव्हरफ्लो साडेसात टीएमसी क्षमतेचे घोड धरण सन १९६५ मध्ये तयार झाले. ५० वर्षात घोड धरण ३५ वेळा ओव्हरफ्लो झाले. घोडच्या पाण्यावर श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावातील १५ हजार ५९० हेक्टर, कर्जत तालुक्यातील १४ गावातील २ हजार ५३५ हेक्टर तर शिरूर तालुक्यातील १७ गावातील ७ हजार १२३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या पाण्यावर ‘नागवडे’ , ‘घोडगंगा’, ‘साईकृपा’,‘अंबालिका’, कुकडी’ ‘साईकृपा’ या साखर कारखान्यांचे भवितव्य अवलंबून आहे . येडगाव धरणामधून कुकडी डाव्या कालव्यात पाणी निघोज : पारनेर तालुक्यातील १४ गावांना वरदान ठरणाऱ्या येडगाव धरणातून कुकडी कालव्यामधून गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पारनेरसह, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. पंधरा दिवसापूर्वी निघोज परिसरात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने बाजरी, कडधान्यासह चारा, फळबागा सुकून चालल्या होत्या. मागील वेळीही पाणी कुकडी नदीला सोडण्यात आले होते. यावेळी पुराचे पाणी कुकडी नदीला सोडण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी कुकडी कालव्याला पाणी सोडण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके, चंद्रकांत लामखडे ,शिवबा ग्रुपचे अध्यक्ष अनिल शेटे, बबनराव कवाद, अमृता रसाळ यांनी दिला होता. दरम्यान, गुरुवारी पालकमंत्री, जलसंपदा मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय होऊन गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान पाणी सोडण्यात आले. कुकडी कालवा लाभक्षेत्रातील रहिवाशांनी सावध रहावे, असे आवाहन पारनेरचे तहसीलदार भारती सागरे यांनी केले आहे. (वार्ताहर)