शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणातून विसर्ग बंद; वांबोरी चारी आवर्तनासाठी तीन दिवसांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:38 IST

राहुरी : मुळा धरणातून जायकवाडीकडे होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाकडे पारनेर तालुक्यातील होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. वांबोरी ...

राहुरी : मुळा धरणातून जायकवाडीकडे होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाकडे पारनेर तालुक्यातील होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. वांबोरी चारीच्या पाईपची दुरूस्ती अंतिंम टप्प्यात असून येत्या दोन तीन दिवसात पुन्हा चारी सुरू होणार आहे.मुळा धरणातून जायकवाडीकडे यंदाच्या पावसाळयात ६ हजार दशलक्ष घनफूट पाणी गेले आहे. मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग दीर्घकाळ सुरू राहिल्याने नदीकाठी असलेल्या शेतीला दिलासा मिळाला आहे. नदीपात्रात असलेले बंधा-यात पाणी साठले आहे. त्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून उसाचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळणार आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी यंदा ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट  पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तन सुरू राहिल्याने आम्हाला पाणी नको, अशी मागणी पाटबंधारे खात्याकडे शेतक-यांना करावी लागली होती. त्यानंतर उजवा कालवा बंद करण्यात आला होता. धरणाच्या उजव्या कालव्यातून यंदाच्या पावसाळयात ९०० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. दोन्ही कालव्याखाली असलेल्या क्षेत्रावर पावसाने सातत्य ठेवल्याने दोन्ही कालवे बंद करावे लागले होते.भागडा चारीखाली असलेले तळे भरण्याचे काम सध्या सुरू आहे. ५० क्युसेकेसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. वांबोरी चारीची दुरूस्तीमुळे गेल्या तीन दिवसांपासून तळ््यासाठी सोडण्यात आलेले पाणी आवर्तन बंद आहे. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मुळा धरणातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. मुळा धरणातून १०२ बंधा-यापैकी ७० बंधारे पूर्ण क्षमतेकडे भरण्याचे काम सुरू होते. अन्य बंधा-यात पाणी जाण्यास तांत्रिक अडचणी असून जास्तीत जास्त क्षमतेने बंधारे भरण्याचे नियोजन सुरू आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी