शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राधाकृष्ण विखे नैराश्येतून बोलतात; त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका : थोरात यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:26 IST

राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये, असेही थोरात म्हणाले.

संगमनेर : संगमनेरात घडलेली घटना दुर्दैवी आहे. असे घडायला नको होते. पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली. ती अत्यंत चुकीची आहे. जो चुकीचा वागला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो कुणीका असेना. त्या पद्धतीने पोलिसांनी, प्रशासनाने काम करावे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये, असेही थोरात म्हणाले.

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना गुरूवारी (दि. ६) संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात घडली होती. या प्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात १० ते १५ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर संगमनेरात झालेल्या हल्ल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी महसूलमंत्री थोरात यांच्यांशी संवाद साधला. सर्व प्रशासन यंत्रणा पोलिसांसह काम करते आहे. ते काम नागरिकांच्या हिताकरिता, त्यांच्या आरोग्याकरिता आहे, असेही थोरात म्हणाले.

   राधाकृष्ण विखे काय बोलतात याला फार महत्व देत जाऊ नका. शेवटी ते आता विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना नैराश्यातून बोलत असतात. जे इथे घडले तसे त्यांच्याकडे काही चुकीचे घडत नाही, असे नाही. शेवटी तो मानवी स्वभाव आहे. नैराश्यातून राधाकृष्ण विखे पाटलांचे बोलणे येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये. असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदार संघात संपर्क राहिला नसल्याचे विखे बोलले होते. त्यावर महसूलमंत्री थोरात यांनी पलटवार केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSangamnerसंगमनेर