शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अहमदनगरमध्ये बनावट अपंग प्रमाणपत्राचे रॅकेट

By साहेबराव नरसाळे | Updated: June 30, 2018 13:38 IST

राज्यात गाजलेल्या शिक्षक बनावट अपंग प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर आता पुन्हा बनावट अपंग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आला आहे. 

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयाकडून पडताळणी : अपंगांची चार प्रमाणपत्रे आढळली बोगस

साहेबराव नरसाळेअहमदनगर : राज्यात गाजलेल्या शिक्षक बनावट अपंग प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर आता पुन्हा बनावट अपंग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या पडताळणीत अपंगांची चार प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बनावट अपंग प्रमाणपत्रे वाटणा-यांचे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे.काही दलालांना हाताशी धरुन नगर जिल्ह्यातील शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र मिळविल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने २०१२ साली उघडकीस आणले होते़. त्यात ७६ शिक्षकांना अटकही झाली होती. त्यानंतर अपंग प्रमाणपत्र देण्याबाबत जिल्हा रुग्णालयाने कडक धोरण स्वीकारले. दरम्यान पुन्हा चार जणांना बनावट अपंग प्रमाणपत्र देण्यात आल्याची बाब जिल्हा रुग्णालयाच्या पडताळणीत उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक पी.एम. मुरंबीकर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र, त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.असा आला घोटाळा उघडकीसजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे वैयक्तिक लाभासाठी अपंग प्रमाणपत्र जोडून काही जणांनी अर्ज केले होते. या अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी समाजकल्याण विभागाने २१ मे २०१८ रोजी जिल्हा रुग्णालयाकडे संबंधित प्रमाणपत्र पाठविले होते.या प्रमाणपत्रांची जिल्हा रुग्णालयात पडताळणी करण्यात आली. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये या प्रमाणपत्रांची कोठेही नोंद आढळून आली नाही. मात्र, जिल्हा रुग्णालयाचे शिक्के या प्रमाणपत्रांवर आढळून आले.याबाबत जिल्हा रुग्णालयाने जिल्हा समाजकल्याण अधिका-यांना ११ जून रोजी पत्र पाठवून ही प्रमाणपत्रे जिल्हा रुग्णालयाने अदा केलेली नाहीत, असा अभिप्राय कळविला आहे.यांनी मिळविले बनावट अपंग प्रमाणपत्रजिल्हा रुग्णालयाच्या पडताळणीत विक्रम विष्णूकांत राठी, विश्वनाथ ज्ञानदेव फाळके, महेश दशरथ मते, सुनील खंडू पवार या चार जणांचे अपंगाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे. या चार जणांनी सादर केलेली प्रमाणपत्रे ओरिजनल प्रमाणपत्रांसारखीच असून, त्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांची सही व जिल्हा रुग्णालयाचा शिक्का आहे. मात्र, या प्रमाणपत्रांची जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये कोठेही नोंद नाही़ यावरुन जिल्हा रुग्णालयातील अधिका-यांना हाताशी धरुनच असे प्रमाणपत्र मिळविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद२०१६ च्या कायद्यानुसार बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवून अपंगांचे लाभ लाटणे किंवा तसा प्रयत्न करणा-यास ६ महिने ते ५ वर्ष शिक्षेची तरतूद आहे. तसेच १० हजार ते ५ लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे.त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी २०१६ च्या कायद्यानुसार या आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.यातील आरोपींवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन बनावट अपंग प्रमाणपत्र देणा-यांचे रॅकेट शोधून काढावे. त्यांच्यावरही गुन्हे नोंदवावेत. - अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, जिल्हाध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनबनावट अपंग प्रमाणपत्र मिळविणा-यांवर २०१६ च्या कायद्यानुसार कडक कारवाई व्हावी. जिल्हा शल्य चिकित्सकांनी दलालांचे रॅकेट शोधून काढावे. अन्यथा आम्ही आंदोलन उभे करणार आहे. - सोमनाथ पवार, शहर संघटक, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनएस.टी.प्रवासाचे मोफत पास मिळावेत, यासाठी चार जणांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज केले होते. त्यांच्याकडील अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी आम्ही जिल्हा रुग्णालयाकडे ते पाठविले. जिल्हा रुग्णालयाने ते चार अपंग प्रमाणपत्र आम्ही दिलेले नाहीत, असा अभिप्राय कळविला आहे. - नितीन उबाळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी,जिल्हा परिषद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय