शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नगर शहरातील मतांसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:15 IST

दक्षिण लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत नगर शहराने भाजपचे दिलीप गांधी यांना ताकद दिली होती़

अण्णा नवथरअहमदनगर : दक्षिण लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत नगर शहराने भाजपचे दिलीप गांधी यांना ताकद दिली होती़ त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र शहरातील मतदारांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मागे ताकद उभी केली होती़ विधानसभा निवडणुकीनंतर चार वर्षांनी झालेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरकरांनी सेना-भाजपला कौल दिला़ आता संदर्भ बदलले असून, लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस व सेना-भाजप एकत्र आले आहेत़ त्यामुळे दोघांना शहरातून मताधिक्य मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार हे निश्चित आहे़गेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातून भाजपाचे दिलीप गांधी यांना ८९ हजार २५८ तर, राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांना ५० हजार ९९३ मते मिळाली होती़ लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेली २०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजप, या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढविली़ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनी पाचवेळा आमदार राहिलेल्या सेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला़ विधानसभा निवडणुकीनंतर चार वर्षांनी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत सेनेने पुन्हा मुसंडी मारली़ सेनेने ६८ पैकी २४ जागा जिंकत शहरावरील वर्चस्व पुन्हा सिध्द केले़ सर्वात कमी १४ जागा मिळविलेल्या भाजपला पाठिंबा देत राष्ट्रवादीने सेनेला सत्तेपासून दूर ठेवले़ सध्याच्या लोकसभा निवडणुकीत मात्र राजकीय समीकरणे बदललेली आहेत़ सेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित या निवडणुकीला सामोरे जात आहेत़ त्यामुळे मागील दोन निवडणुकांतील बळ कायम राखण्याचे आव्हान आघाडी व युतीच्या नेत्यांसमोर आहे़ एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीत शहरातील मतदारांची भूमिका महत्वाची असून, या मतदारांचा कौल मिळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा लागली आहे़लोकसभा २०१४दिलीप गांधी (भाजप)- ८९,२५८राजीव राजळे (राष्ट्रवादी)- ५०,९९३विधानसभा २०१४संग्राम जगताप (राष्ट्रवादी)- ४९,३७८अनिल राठोड (शिवसेना)- ४६,०६१सत्यजित तांबे ( काँग्रेस)- २७,०७६अ‍ॅड़ अभय आगरकर (भाजप)-३९,९१३महापालिकेतील संख्याबळशिवसेना- २४राष्ट्रवादी- १८भाजप- १४काँग्रेस- ५बसपा- ४अपक्ष- १

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019