शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

दहशत माजविणा-यांची भाजपमध्ये रांग : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 10:48 IST

भाजप हा आयात उमेदवारांचा पक्ष आहे. त्यांची वैयक्तिक संघटना शून्य आहे. पैसा, सत्ता आणि दबावाच्या जोरावर त्यांनी उमेदवार आयात केले.

अहमदनगर : भाजप हा आयात उमेदवारांचा पक्ष आहे. त्यांची वैयक्तिक संघटना शून्य आहे. पैसा, सत्ता आणि दबावाच्या जोरावर त्यांनी उमेदवार आयात केले. नगर शहरातही दहशत माजविणा-यांची या पक्षात रांग लागली आहे. केडगावचे आमचे उमेदवार त्यांनी दहशत करुन पळविले, अशी टीका काँग्रेसचे युवक नेते डॉ. सुजय विखे यांनी केली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी ‘लोकमत’ फेसबुक लाईव्हमध्ये आपली भूमिका मांडली.कॉंग्रेसचे नगरसेवक भाजपात कसे गेले? या प्रश्नावर ते म्हणाले, हा विषय अचानक घडला. ते कोतकर यांचे समर्थक होते. त्यांच्या आदेशाने ते भाजपात गेले. मात्र २४ तासात तिथे काँग्रेसने दुसरे उमेदवार दिले. भाजपने दबाव टाकून या लोकांना पक्षात घेतले.दोन्ही कॉंग्रेस नगर शहरात दहशत करते या शिवसेनेच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, दहशत कोण करतेय हे शिवसेनेने नावानिशी सांगावे. दहशत करणारे आज निवडूनच येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. लोक अशा दादांना पराभूत करतात. आपणही दहशतीला कधीच मदत करणार नाही. दहशतीपेक्षा काम करणे महत्त्वाचे आहे. संग्राम जगताप, संदीप कोतकर, सुवर्णा कोतकर यांनी शहरात चांगले काम केले म्हणूनच लोकांनी त्यांना स्वीकारले. संदीप कोतकर आणि संग्राम जगताप हे महापौर असताना आघाडीच्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला आला, हीही बाब लक्षात घ्यावी लागेल. केवळ टीका करणे गैर आहे.गांधी यांना शून्य गुणखासदार दिलीप गांधी यांना त्यांच्या कामाबद्दल किती गुण द्याल, असा प्रश्न केला असता विखे म्हणाले, शून्यापेक्षाही कमी गुण देईल. भाजप आज शहरात विकासाचे फलक लावत आहे. मग, आजवर त्यांनी काय दिले लावले? हेही सांगावे.महापौर पदाचे उमेदवार जाहीर करामहापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महापौर पदाचे उमेदवार जाहीर होणे आवश्यक आहे. लोक एकतर महापौर पदाचा चेहरा पाहून मतदान करतात किंवा नगरसेवक पदाचा उमेदवार पाहून. कॉंग्रेस कमी जागांवर लढत असल्याने आम्ही राष्टÑवादीच्या पाठिशी राहणार आहोत. शहरात आघाडीचा महापौर होणार हे निश्चित आहे.आमच्याकडे शहर विकासाचे खाते नव्हतेविखे, थोरात हे मातब्बर नेते जिल्ह्यात असताना नगर शहर का सुधारले नाही? या प्रश्नावर विखे म्हणाले, आपल्या वडिलांकडे मंत्रिपद होते. मात्र, शहराचा विकास करता येईल असे नगरविकास किंवा गृहखाते नव्हते. ते असते तर वेगळे घडले असते. तरीपण आपले आजोबा व वडिलांमुळे आरटीओ कार्यालयाची जागा व इतर अनेक प्रश्न सुटले आहेत.मी बोलू कोणाविरुद्धमी कोणाविरुद्ध बोलू, अशी माझी संभ्रमावस्था झाली आहे. दहावे आणि लग्न करणे ही निवडून येण्याची पात्रता नसली पाहिजे. विकास कामे करणे हीच खरी पात्रता आहे. राहाता तालुक्यात भरपूर कामे केली आहेत. कोणत्याही पक्षावर मला टीका करायची नाही. मात्र दुर्दैवाने मला भाजपवर टीका करावी लागते. मी कोणाविरुद्ध बोललो की मलाच त्रास होतो.उड्डाणपूल हे केवळ भूत‘वो स्त्री यहॉ मत आना’ या ‘स्त्री’ चित्रपटातील कथेसारखी उड्डाणपुलाची स्थिती आहे. वो उड्डाणपूल यहाँ मत आना. उड्डाणपूल हे केवळ भूत आहे. निवडणूक आली की हे भूत येते. उड्डाणपुलाचे फलक लावले. मात्र प्रत्यक्ष काय कार्यवाही झाली? सर्वे, भूसंपादन, याची कुठेच माहिती नाही. उड्डाणपूल जाऊ द्या, मात्र बाह्यवळण रस्त्याला २५ कोटी दिले तरी खूप काही होईल. या रस्त्याची आज काय दुर्दशा झाली आहे, हे आपण सर्वजण पाहतो आहोत. उड्डाणपूल करायचे काम हे महापालिकेचे नव्हे तर निवडून आलेल्या खासदारांचे आहे. केंद्राच्या निधीतूनच पूल झाला पाहिजे. महापालिकेची सत्ता आणि पुलाचा काहीही संबंध नाही. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे देशातील रस्त्यांची कामे करीत आहेत. त्याअंतर्गत हा पूल आहे. त्यासाठी खासदारांनी पाठपुरावा केला पाहिजे. महापालिकेचे अनेक वर्षांचे बजेट एकत्र केले तरी पूल होणार नाही.‘लोकमत’च्या मुलाखतींना तुफान प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सुरू केलेल्या रोखठोक फेसबुक लाईव्ह मुलाखतींना तुफान प्रतिसाद मिळत आहे.आ. संग्राम जगताप यांची मुलाखत साडे आठ हजारांहून अधिक फेसबुक वाचकांनी पाहिली.अनिल राठोड यांच्या मुलाखतीला पहिल्या दोनच दिवसात सहा हजार ‘व्ह्युज’ मिळाल्या आहेत.सुजय विखे यांच्या मुलाखतीला पहिल्या चार तासात अडीच हजार ‘व्ह्युज’ मिळाल्या आहेत. नगर शहरात प्रथमच असा प्रयोग होत आहे. या प्रयोगाबद्दल वाचकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.व्हिडिओ पाहण्यासाठी ` lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका