आॅनलाईन लोकमतपाथर्डी, दि़ १६ - शहरातील जुन्या बस स्थानकावर खिसेकापूंचा धुमाकूळ सुरूच आहे. गर्दीचा फायदा घेऊन खिशातून रक्कम लांबविण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.पाथर्डीच्या बुधवारच्या आठवडे बाजारच्या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास बसमध्ये चढत असताना खिसेकापूंनी किसन आव्हाड यांच्या खिशातून १५३०० रुपये तसेच आधारकार्ड, मतदान कार्ड चोरून नेले. याबाबत आव्हाड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास हवालदार बाबा भोसले करीत आहेत.
पाथर्डी बस स्थानकावर खिसेकापूंचा धुमाकूळ
By admin | Updated: June 16, 2017 14:57 IST