शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यातील जांभळाची पुणेकरांना गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:45 IST

श्रीगोंदा-चांडगाव रस्त्यावर शेती असणा-या संपत किसन कोथिंबीरे यांच्या जांभळाची पुणेकरांना गोडी लागली आहे. जांभळाला प्रति किलो अडीचशे रूपयांचा भाव मिळत आहे. यासाठी अगाऊ मागणी होत असून आॅनलाईन पेमेंट मिळाल्यानंतर जांभूळ पोहोच केले जात आहे.  कोरोना काळात शेतकरी हतबल झालेले असतानाच कोथिंबीरे यांच्या जांभळाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

शरद शिंदे  । 

आढळगाव : श्रीगोंदा-चांडगाव रस्त्यावर शेती असणा-या संपत किसन कोथिंबीरे यांच्या जांभळाची पुणेकरांना गोडी लागली आहे. जांभळाला प्रति किलो अडीचशे रूपयांचा भाव मिळत आहे. यासाठी अगाऊ मागणी होत असून आॅनलाईन पेमेंट मिळाल्यानंतर जांभूळ पोहोच केले जात आहे.  कोरोना काळात शेतकरी हतबल झालेले असतानाच कोथिंबीरे यांच्या जांभळाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

संपत कोथिंबीरे यांना साडेनऊ एकर शेती आहे. त्यामध्ये पाच एकर द्राक्षे, तीन एकर डाळिंब आहे. जेमतेम शिक्षण असलेले कोथिंबीरे शेतीच्या अभ्यासासाठी राज्यभर फिरले आहेत. त्या अभ्यासातून त्यांनी जांभूळाचे व्यावसायिक महत्व ओळखले. केवळ सव्वा एकर क्षेत्रात चार वर्षापूर्वी बहाडोली वानाचे जांभूळ लावले. सोळा बाय सोळा फूट अंतरावर लागवड केली.  त्यात अडीचशे झाडे बसली. शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला. औषधी गुणधर्माबरोबरच उत्तम सौंदर्य प्रसाधक असलेल्या आंबट, गोड आणि तुरट चव असणाºया रसाळ जांभूळाला मोठी मागणी असते. गेल्या वर्षी फळांना सुरुवात झाली. यावर्षी कोथिंबीरे परिवाराने जांभळाच्या शेतीला विशेष लक्ष देऊन जोमदार फळ आणले. 

कोथिंबीरे यांच्या पत्नी नंदा दिवसभर स्थानिक मजुरांच्या मदतीने निगुतीने झाडावरून फळे काढून घेतात. शाळांना लॉकडाऊन असल्यामुळे घरीच असलेली मुले सोनाली, वैष्णवी आणि ओम हे फळांची प्रतवारी करून प्रत्येक फळ पाहून बॉक्समध्ये भरतात. मागणीनुसार बॉक्स भरून सकाळीच्या वेळी लवकरच स्वत: संपत कोथिंबिरे पुण्याला रवाना होतात. यातून त्यांना दहा लाखाच्या उत्पन्नाची आशा आहे. तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कृषी सहाय्यक अजिनाथ फंड यांनी भेट देऊन जांभूळ शेतीचे कौतुक केले.

शेतक-यानेच ठरविला भावकोरोनाच्या संकटामुळे शहरांतील फळविक्रीची साखळी ब्रेक झाली होती. कोथिंबीरे यांचा कष्टाने मिळविलेल्या आपल्या उत्पादनावर विश्वास असल्यामुळे पुण्याची बाजारपेठ काबीज करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाला न घाबरता आरोग्याची काळजी  घेऊन पुणे परिसरातील रहिवासी सोसायट्यांमध्ये एक किलोच्या आकर्षक पॅकिंगच्या ‘कोथिंबीरे फार्म’च्या ब्रँडने जांभूळ विक्री सुरू केली.  दर्जेदार जांभळामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. पुण्याच्या बाजारपेठेत व्यापा-यांच्या नाही तर कोथिंबीरेंच्या मतावर जांभळाचा बाजार ठरला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा