शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दराने दूध, उडीद खरेदीसाठी कर्जतमध्ये रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:58 IST

कर्जत तालुक्यातील भारनियमन बंद करावे, शेतक-यांचा उडीद विनाअट खरेदी करावा, शासकीय दराने दूध खरेदी करावी, अहमदनगर-सोलापूर राज्य मार्गाची दुरुस्ती करावी, माहिजळगाव परिसराला कुकडीचे पाणी नियमित मिळावे, या मागण्यांसाठी रास्ता रोको

कर्जत : शासकी दराने दूध, उडीद खरेदीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी माहिजळगाव येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास २४ आॅक्टोबर रोजी कर्जत येथे दंडूके मोर्चा काढून शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यातील भारनियमन बंद करावे, शेतक-यांचा उडीद विनाअट खरेदी करावा, शासकीय दराने दूध खरेदी करावी, अहमदनगर-सोलापूर राज्य मार्गाची दुरुस्ती करावी, माहिजळगाव परिसराला कुकडीचे पाणी नियमित मिळावे, या मागण्यासाठी कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली माहिजळगाव येथे चौफुल्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दोन तास चालले. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संतप्त शेतक-यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली. भाजपचे सरकार अच्छे दिन आणेल, असा सर्वांना विश्वास होता. मात्र या सरकारने भ्रमनिरास केला. हे शेतकरी हिताचे नाही तर व्यापारी हिताचे सरकार आहे, कशी टीका करण्यात आली. यामुळे ऐन दिवाळीत शेतक-यांना त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले आहे. या आंदोलनात माहिजळगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी किरण पाटील, युवक काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, काँग्रेस नेते बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, कैलास शेवाळे, शेतकरी संघटनेचे संजय तोरडमल, भानुदास हाके यांची भाषणे झाली़ आंदोलनात सतिष पाटील, संतोष धुमाळ, किशोर कोपनर, सुभाष महारनवर, कांतिलाल देवगिरे, गोकुळ इरकर, विष्णू खेडकर, नवनाथ कदम यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलक उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी बदलला मार्ग

पालकमंत्री राम शिंदे हे आज सकाळी चौंडी येथे होते़ ते माहिजळगावमार्गे नगरला जाणार होते. मात्र या आंदोलनामुळे पालकमंत्र्यांनी मार्ग बदलला व ते जामखेडमार्गे नगरला गेले. पालकमंत्र्यांनी आंदोलकांना घाबरुन मार्ग बदलला, असे कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीStrikeसंप