शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणतांबा ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST

पुणतांबा-वाकडी या रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदन, आंदोलन, उपोषण करून सुद्धा लोकप्रतिनिधींकडून आश्वासन व्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही होत ...

पुणतांबा-वाकडी या रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदन, आंदोलन, उपोषण करून सुद्धा लोकप्रतिनिधींकडून आश्वासन व्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही होत नाही. लक्ष्मीनारायण मित्रमंडळ, वाकडी रस्त्याचे रहिवासी यांनी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करत येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक, राजकीय पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असून मतदान करणार नाही, असा इशारा देण्यात आला. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून गेल्या पंधरा-वीस वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. बाभळेश्वर, राजुरी, वाकडी, येलमवाडी, कोल्हार येथे जाण्यासाठी अतिशय जवळचा रस्ता असून पुणतांबा व रामपूरवाडी येथील शेतकरी बांधवांच्या जमिनी आहेत. त्यांचा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे. शिक्षणासाठी शालेय विद्यार्थी दररोज याच रस्त्याने ये-जा करतात. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देऊन वेळ मारुन नेतात, असा संताप या परिसरातील नागरिकांनी व्यक्त करत रस्त्यावरील साचलेल्या डबक्यात वृक्षारोपण केले.

वृक्षारोपणप्रसंगी नामदेवराव धनवटे, विनोद धनवटे, ज्ञानेश्वर धनवटे, भास्कर घोडेकर, सोपानराव धनवटे, सुधाकर घोडेकर, मनोज घोडेकर, हरीष पेटकर, सोमनाथ पेटकर, सतीश धनवटे, महेश बोर्डे, बाळासाहेब धनवटे, राजेंद्र घोडेकर, मनोज घोडेकर, विक्रम शिंदे, संतोष जोगदंड, संतोष धनवटे, सुनील धनवटे, पुंजा धनवटे, राजेंद्र घोडेकर, गणेश घोडेकर, सुनील घोडेकर, राजेंद्र पेटकर, ताराचंद शेलार, महेश डोके, भारत शेलार, विजय गाडेकर, वाल्मीक घोडेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.

............................

मागील वर्षी रस्ता दुरुस्तीकरिता आमरण उपोषणाला बसलो होतो, परंतु गेल्या वर्षभरात त्यांची कोणतीही दखल शासनाने घेतली नाही.

-विनोद धनवटे, नागरिक

...................

या रस्त्याच्या निविदा उघडलेल्या आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत कोणती एजन्सी काम करणार याची माहिती कळेल व लवकरच काम चालू होणार आहे.

- प्रशांत वाकचौरे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव