शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शेवगावातील श्रीराम ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याचे प्रांताधिका-यांचे आदेश; ‘लोकमत’ने वृत्तमालिकेतून वेधले होते लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:30 IST

 शेवगाव शहरातील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. संबंधित जागेच्या भाडेपट्टा फेरफार, इतर हक्कात घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. दोन वर्षापासून ‘लोकमत’ ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधले होते.

 शेवगाव : शहरातील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. संबंधित जागेच्या भाडेपट्टा फेरफार, इतर हक्कात घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. दोन वर्षापासून ‘लोकमत’ ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधले होते. शेवगाव शहरातील नेवासा रस्त्यावरील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवर बेकायदा हॉटेल, शोरूम, दुकाने, इमारती उभारण्यात आल्या होत्या. बेकायदा हस्तांतरित झालेल्या जमिनीच्या नोंदींबाबतचे हे प्रकरण ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे उजेडात आणले होते. या प्रकरणाची सुनावणी प्रांताधिका-यांसमोर सुरू होती.याबाबत दिलेल्या आदेशात प्रातांधिकाºयांनी म्हटले आहे की, महसूल व वन विभाग यांच्या परिपत्रकान्वये देवस्थान जमिनीची तपासणी करून बेकायदा हस्तांतरित झालेल्या जमिनीच्या नोंदीचे पुनर्रिक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार श्रीराम देवस्थान ट्रस्ट इनाम वर्ग तीनमधील जमिनीचा बेकायदा भाडेपट्टा करार रद्द करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांनी दिला होता. याबाबतच्या नोंदी पुनर्रिक्षण करण्यासाठी संबंधीतांना लेखी व तोंडी म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाकडून याबाबतचा निकाल पारित करण्यात आला. भाडेपट्टा फेरफार व इतर हक्कात घेतलेल्या सर्व नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देवस्थान ट्रस्टच्या गट नं. १३१३, १३१४ व १३१५ वरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी संयुक्त मोहीम हाती घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.या निकालाच्या पार्श्वभूमीवर लड्डा धर्मशाळा जागेवरील अनाधिकृत बांधकामाचा विषयही चर्चेत आला आहे. त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.अतिक्रमणाबाबत सोमवारी बैठक..तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी यांची सोमवारी (दि.९) दुपारी दोन वाजता येथील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात शेवगाव येथे बैठक होणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव