शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेसाठी चिमुकल्यांचे आंदोलन, लेखी आश्वासनानंतर पाचेगाव येथील विद्यार्थ्यांचे उपोषण सुटले

By साहेबराव नरसाळे | Updated: October 5, 2023 20:22 IST

विनाअडथळा शाळा खोल्यांचे काम करण्याचे लेखी आश्वासन

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: एकीकडे राज्य शासनाकडून मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा केली जाते. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कुचंबणा कशी सुरु आहे, याचे बोलके चित्र नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील मराठी शाळेच्या मंजूर असलेल्या तीन नवीन खोल्यांच्या बांधकामातून दिसून येत आहे. या शाळा खोल्यांचे काम व्हावे, यासाठी चक्क शाळेतील चिमुकल्या मुलांनाच उपोषणाला बसण्याची दुर्दैवी वेळ आली. दुपारी तालुका प्रशासनाला जाग आली अन् त्यांनी विनाअडथळा शाळा खोल्यांचे काम करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर चिमुकल्यांनी उपोषण मागे घेतले.

अधिकाऱ्यांनी अधोरेखित केलेल्या मोकळ्या जागेवरच शाळा खोल्यांचे बांधकाम विना अडथळा सुरू करावे. तसेच बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, लेखी निवेदनाशिवाय काम बंद करू नये आदी. मागणीचे शालेय व्यवस्थापन समितीने गत आठवड्यात तहसीलदार,पंचायत समिती विभाग, पोलिस स्टेशन यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

पाचेगाव जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मंजूर असलेल्या तीन शाळा खोल्यांचे बांधकाम थांबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिल्याने विद्यार्थ्यांच्या बैठकीचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे निवेदन देऊनही बांधकाम सुरू न झाल्याने अखेर विद्यार्थी, पालक आणि शालेय व्यवस्थापनाचे सदस्य यांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

दुपारी १ वाजता नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, बांधकाम अभियंता राजेंद्र नागपुरे, उपअभियंता दत्तात्रय कर्डिले, पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, गटशिक्षण अधिकारी शिवाजीराव कऱ्हाड यांनी उपोषणकर्त्याशी संवाद साधत बांधकाम विना अडथळा सुरू राहील, अशा आशयाचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी दीड वाजता उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थी