शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वृध्देश्वर देवस्थानच्या नवीन विश्वस्त निवडीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 17:52 IST

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या पुढील पाच वर्षाच्या नवीन विश्वस्त निवडीचा अध्यादेश अहमदनगर येथील धमार्दाय आयुक्ताने बुधवारी एका नोटिशीव्दारे बजावला. त्यामुळे विश्वस्त निवडीचे प्रक्रिया सुरू झाली आहे.

करंजी : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या पुढील पाच वर्षाच्या नवीन विश्वस्त निवडीचा अध्यादेश अहमदनगर येथील धमार्दाय आयुक्ताने बुधवारी एका नोटिशीव्दारे बजावला. त्यामुळे विश्वस्त निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथे जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक वृध्देश्वरच्या दर्शनासाठी येतात. देवस्थानला मोठ्या प्रमाणात उत्पन्न असूनही येथे भाविकांना काहीच सुविधा मिळत नव्हत्या. देवस्थानचा विकास होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी व भाविकांनी केल्या होत्या. परंतू देवस्थानच्या घटनेत या देवस्थानचा अध्यक्ष हा अजिवन राहील असे नमुद केलेले होते. याबाबत ‘लोकमत’ने या प्रकरणाला प्रथम वाचा फोडून हा प्रकार उघडकीस आणला होता. ग्रामस्थांनी देवस्थानच्या घटनेत बदल व्हावा यासाठी नगर, पुणे येथील धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. मागील महिन्यात पुणे येथील धर्मदाय आयुक्तांनी निकाल देवून देवस्थान कमिटीची निवड अहमदनगर येथील धर्मदाय आयुक्त करतील, असा निकाल दिला होता. त्यावरून नगरच्या धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्त निवडीसाठी नोटीस बजावली आहे. सदर आदेश ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात आला आहे. वृध्देश्वर देवस्थान विश्वस्तांसाठी इच्छुक उमेदवार हा घाटसिरस (ता.पाथर्डी) येथील रहिवासी असावा. त्याचे वय १८ वर्ष पूर्ण व हिंदू स्त्री किंवा पुरुष असला पाहिजे. विहित नमुन्यातील अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अहमदनगर येथे १७ आक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यालयात किंवा त्यापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पोष्टाने अथवा समक्ष येवून पोहोच करावेत. या अर्जासोबत उमेदवाराने स्वत:च्या चारित्र्याचे पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्र जोडावे. अर्जातील माहिती खरी असल्याचे १०० रूपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावे. मौजे घाटसिरस येथील रहिवासी असल्याचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, असे सहायक धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी नोटिसीव्दारे कळविले आहे. वृध्देश्वर देवस्थानच्या इतिहासात प्रथमच घाटसिरस ग्रामस्थांना देवस्थानचा कारभार पाहण्याची संधी मिळाली आहे. तरी जास्तीत, जास्त ग्रामस्थांनी देवस्थानच्या विकासासाठी अर्ज करावेत, असे उपसरपंच नवनाथ पाठक यांनी सांगितले.

अखेर आम्हाला न्याय मिळाला. या ऐतिहासिक घटनेमुळे देवस्थानच्या विकासाची दारे उघडली आहेत. या लढ्यात ‘लोकमत’ने महत्वाची भूमिका बजावली, असे तक्रारदार हिमंत पडोळे, एकनाथ पाठक यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर