शेवगाव : तालुक्यातील नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर येथे स्वच्छ भारत अभियानअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालय इमारतीचे भूमिपूजन जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे येथील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
लाडजळगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर व स्वच्छ भारत अभियानअंतर्गत श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थानसाठी तीन लाख रुपये खर्चाची सार्वजनिक शौचालयाची इमारत तयार होत आहे. याचा भूमिपूजन कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी केदारेश्वर देवस्थानचे मठाधिपती बाबागिरी महाराज, जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, राजुभाऊ पोटफोडे, नागलवाडीचे सरपंच ॲड. किरण जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदीप गीते, माजी सरपंच गोरख खेडकर यांच्यासह किसनराव राठोड, नवनाथ फुंदे, नवनाथ खेडकर, रामजी गीते सर, बप्पासाहेब बर्डे, ॲड. बाळासाहेब शिंदे, दुर्गाजी रसाळ, ग्रामसेवक शिनगारे, ठेकेदार भारत लांडे आदी उपस्थित होते.