राज्यातील सर्व खासगी आयटीआय गेल्या ३६ वर्षांपासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यांना शासनाकडून अद्यापपर्यंत आर्थिक मदत अथवा अनुदान मिळत नाही. या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या फीसवर संस्था चालू आहेत. मात्र कोरोनाच्या काळात पालक व विद्यार्थी आर्थिक परिस्थितीअभावी फी भरू शकले नाहीत. पर्यायाने संस्था आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. राज्यात सरासरी प्रत्येक खासगी आयटीआयमध्ये ५० ते ६० अश्वशक्तीचा लोड असलेले वीज कनेक्शन घेतलेले आहेत. कोरोनाच्या काळात प्रॅक्टिकल काही महिने बंद असल्याने विजेचा वापर कमी झालेला आहे. मात्र विजबिलामध्ये इतर अधिभार व भाडे यामुळे आयटीआयला वीजबिल जास्त येते. फी नाही म्हणून आर्थिक अडचणीत सापडलेल्या या संस्थांनी बिल भरले नाही म्हणून त्यांचे वितरण मंडळाने वीज कनेक्शन कट केले. बिल वसूल करताना थकीत वीजबिलावर दंड म्हणून व्याज आकरलेले आहे. यामुळे खासगी आयटीआय अधिकच आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे कोरोनाकाळातील वीजबिल माफ करावे व त्यांना वीजदरामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
.................
सकारात्मक विचार करू : तनपुरे
कायम विनाअनुदानित तत्त्वावर चालू असलेल्या खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे कोरोनाकाळातील वीजबिल माफ करणे किंवा वीजदरामध्ये सवलत देण्याबाबत विचार करू, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.