शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तुरूंगांची तटबंदी होणार भक्कम

By admin | Updated: March 18, 2024 16:19 IST

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच तुरूंगांची तटबंदी अधिक भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरमहाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच तुरूंगांची तटबंदी अधिक भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी सादर केलेल्या ६० कोटी रूपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार प्रमुख तुरूंगांमध्ये स्कॅनर बसविण्यात येणार आहेत.राज्यातील तुरूंगांचे २०१४-१५ या वर्षात आधुनिकीकरण करण्यासाठी १ कोटी ८१ लाख ३० हजार रूपये अर्थसंकल्पित आहेत. त्यातून १ कोटी ८ लाख ७८ हजार रूपये खर्चून तळोजा, कोल्हापूर, नाशिकरोड, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा मध्यवर्ती तुरूंगांत ३० लाख २० हजार रूपये किंमतीचे प्रत्येकी एक बॅगेज स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. यास १० सप्टेंबरला गृह विभागाने मंजुरी दिली.१३ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०११-१२ ते २०१४-१५ या वर्षासाठी महाराष्ट्रातील तुरूंगांच्या सोयी-सुविधा वाढीसाठी ३० कोटी ५६ लाख १६ हजार व तुरूंगांतर्गत सुरक्षा व्यवस्था सुधारणेसाठी २९ कोटी ४३ लाख ८४ हजार रूपये असा एकूण ६० कोटींचा कृती आराखडा महानिरीक्षकांनी तयार केला. केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विविध प्रयोजनाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार सन २०१३-१४ मधील कामांच्या अंदाजपत्रकास गृह खात्याची सुधारित प्रशासकीय मान्यता ९ सप्टेंबरला मिळाली. यात तुरूंगांमधील सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी ७ कोटी ६४ लाख ४ हजार व तुरूंगांतर्गत सुरक्षा व्यवस्था सुधारणेसाठी ७ कोटी ५१ लाख ३१ हजार ९०९ अशा एकूण १५ कोटी १५ लाख ३५ हजार ९०९ खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातून राज्यातील लहान मोठ्या तुरूंगांची तटबंदी भक्कम होणार आहे. या तुरूंगांचा समावेशयेरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे, मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, येरवडा खुले जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, रत्नागिरी विशेष कारागृह, धुळे जिल्हा कारागृह धुळे, जिल्हा खुले कारागृह पैठण (औरंगाबाद), अकोला जिल्हा कारागृह, भंडारा जिल्हा कारागृह, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नाशिकचे बोस्टल स्कूल. अलिबाग, परभणी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, सोलापूर, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर जिल्हा कारागृह, विसापूर जिल्हा कारागृह (अहमदनगर), आटपाटी खुली वसाहत.