या कारागृहामध्ये पाच बराकी असून पंचवीस आरोपी ठेवण्याची क्षमता आहे. या पाच बराकीमध्ये सत्तर आरोपी ठेवण्यात आले आहेत. या आरोपींना ठेवण्यास मध्यवर्ती कारागृहदेखील नकार देत असल्याने नेवाशातच क्षमतेपेक्षा तिप्पट आरोपी ठेवण्यात आले आहेत. २४ जुलै रोजी कारागृहातील काही आरोपींना त्रास जाणवू लागल्याने सर्व ७० आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील मंगळवारी १७ आरोपी बाधित आढळून आले आहेत. यात नेवासा पोलीस ठाण्यातील दहा, सोनई पोलीस ठाण्यातील सहा व शिंगणापूर पोलीस ठाण्यातील एका आरोपीचा समावेश आहे. यातील पंधरा आरोपींना उपचारांसाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले असून, एकावर नेवासा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक आरोपी पोलीस कोठडीत असल्याने त्यास वेगळ्या बराकमध्ये ठेवण्यात आल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. गतवर्षी जून महिन्यातही ४७ आरोपींपैकी २२ आरोपींना कोरोनाची लागण झाली होती.
तुरुंगातील आरोपींना पुन्हा कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST