अहमदनगर : सर्जेपुरा येथे एका निवासी इमारतीच्या तळमजल्यात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर धडक कारवाई करून तोफखाना पोलिसांनी पार्लरचालकासह ३० जणांना अटक केली. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सर्जेपुरा परिसरातील एका निवासी इमारतीच्या तळमजल्यावर कृष्णा अशोक इंगळे हा ‘स्नुकर व हुक्का पार्लर’ या आस्थापनेवर सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग झोन कागदपत्र व नकाशा नसताना बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर चालवित होता. त्यामुळे तोफखान्याचे उपनिरीक्षक संजयकुमार सोने, पोलीस नाईक वाघमारे, दौड, गायकवाड, जगताप, रोहकले, कोतकर, जावेद शेख यांच्या पथकाने बुधवारी रात्री सर्जेपुरा येथे छापा टाकून हुक्का पित असलेल्या ३० जणांना अटक केली.यामध्ये जस्वीन राकेश पहुजा (गुलमोहर रोड), कुरेशी अहमद गयाज (नालबंद खुंट), गिरीश चुहीत्रामानी, संजय सदामल बोहरानी (रा. उल्हासनगर), प्रशांत गजानन सोनवणे (धूतसागर कॉलनी), सचिन संजय घोरपडे (रामवाडी, सर्जेपुरा), विशाल विरेंद्र पितळे (मार्केट यार्ड), महावीर सरदारमल शिंगी (माणिकचौक), स्वप्निल संजय जैन (बागडपट्टी), नागेश गोरख शिंदे (वैदुवाडी, सावेडी), जयेश तुकाराम भिंगारदिवे (सावेडी गाव), दत्तात्रय अंबादास गोसके (बागडपट्टी), किरण चंद्रकांत बोगा, वैभव दीपक कोठा, चिल्का प्रेम गोविंदा, ओम संजय पुंड, (सातभाई गल्ली), सचिन नरसैय्या पासकंठी, अजय दराडे (बागडपट्टी), राज नरेश नागुल (भिस्तबाग चौक), मोहित प्रदीप मुथा (सारसनगर), सागर विलास मुनोत (मार्केट यार्ड), अमित भाऊसाहेब शेवाळे (आनंदनगर, सावेडी), वृषभ हेमंत डागा (गोवर्धन अपार्टमेंट), अमोल राजेंद्र पवार (कोहिनूर मंगल कार्यालयामागे, सावेडी), वृषभ प्रदीप मेहता (सावेडी), बलराम अशोक कोकांत (तोफखाना), संदेश अतुल भंडारी (खिस्तगल्ली), गगन शरद शिंदे (माळीवाडा), सागर आनंद नायडू (संजयनगर), शेख अबरार नय्युम (बाराइमाम कोठला) यांचा अटक केलेल्यांत समावेश आहे.पोलिसांनी या सर्वांविरोधात सिगारेट व तंबाखू उत्पादने जाहिरात प्रतिबंध व्यापार उत्पादन पुरवठा वितरण विनिमय अधि. २००३ कलम ४ व कलम ३३(७) नुसार गुन्हा दाखल केला आहे.