शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात वाळू उपशावर छापा; ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 13:29 IST

आढळगाव येथील देव नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे छापा टाकून ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

श्रीगोंदा : आढळगाव येथील देव नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे छापा टाकून दोन जेसीबी मशीन, दोन ट्रॅक्टर, एक ट्रक आणि दोन दुचाकी असा ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी रोहित मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस कर्मचारी रोहित मिसाळ, विजय वेठेकर, प्रकाश वाघ, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे हे सोमवारी रात्रीच्या सुमारास फरार आरोपीचा शोधासाठी आढळगाव शिवारात आले होते. त्याच दरम्यान आढळगाव येथील देवनदीपात्रात वाळूउपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने पहाटेच्या दरम्यान नदीपात्रात छापा टाकला असता जेसीबी मशीनच्या सहाय्याने दोन ट्रॅक्टर व ट्रकमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. पोलीस पथकाने हे सर्व साहित्य जप्त करत चार जणांना ताब्यात   घेतले. तर इतर तिघे अंधाराचा   फायदा घेत पसार झाले. पोलीस पथकाने या कारवाईत ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अक्षय सुनील राहिंज , राहुल भास्कर लांडगे, (रा. काष्टी), महेश राजेंद्र भैलुमे (रा. आढळगाव),  भाऊसाहेब जयशिंग सकट, (रा.सुरोडी), संतोष सुपेकर, संतोष मिसाळ, मंगेश मोटे (रा. श्रीगोंदा) व इतर तीन अनोळखी इसमाविरोधात वाळू चोरी, पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा