शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भाव वाढीसाठी नेवासाफाटा येथे दूध उत्पादकांचे चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:28 IST

दुधाला योग्य भाव मिळण्याच्या मागणीसाठी आज नेवासाफाटा येथे सर्व प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने रास्तारोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

नेवासा : दुधाला योग्य भाव मिळण्याच्या मागणीसाठी आज नेवासाफाटा येथे सर्व प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने रास्तारोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दूध भाव वाढीच्या आश्वासनाची पूर्तता न करणारे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे थापा मारणारे मंत्री असल्याची टीका प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी केली.यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर यांना निवेदन देण्यात आले.नगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासाफाटा येथे सुमारे पाऊण तास चाललेल्या रास्तारोको व चक्काजाम आंदोलन प्रसंगी नेवासा तालुका परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुधाने अंघोळ घालण्यात आली.    रास्तारोको व चक्काजाम आंदोलन प्रसंगी नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी सरकार दूध भाव वाढीबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत भाव वाढीबाबत सरकारने वेळीच लक्ष न घातल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. अतुल खुपसे म्हणाले, आपण सर्व ही शेतक-यांची मुले आहोत. दूध व्यवसायाला सबसिडी मिळाली पाहिजे तसेच हमीभाव ही सरकारने दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विनोदसिंह परदेशी, पी.आर.जाधव, शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, संभाजी ब्रिग्रेडचे गणेश चौघुले, नितीन पानसरे, अजित धस, श्याम ढोकने, नागेश आघाव, रघुनाथ अरगडे, विजय म्हस्के, प्रकाश बेरड, संगीता शर्मा, संदीप डौले, प्रवीण कदम, महेश पठारे, अमोल कातुरे, रउफ पटेल, भाऊसाहेब शेळके पाटील, विकी मोरे, नितीन पुंड, सुरेश शेळके, नानासाहेब भारस्कर, सोमनाथ सांगळे, संदीप पाखरे, अमोल जोगदंड यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा