बाजार समितीने सर्व मूग उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे, बाजार समितीच्या मुख्य यार्डच्या भुसार विभागामध्ये मूग या शेतमालाची आवक सुरु झाली असून सोमवारी (दि.९) ५०० ते ६०० डाग आवक आली आहे. त्यास जास्तीत-जास्त बाजारभाव प्रति क्विंटल ७ हजार १३५ रूपयांप्रमाणे मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत भुसार बाजार चालू असल्याने लिलाव सकाळी ११ वाजता सुरु होणार असून सर्व मूग उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल सकाळी ११ वाजेपर्यंत विक्रीसाठी सुकवून व स्वच्छ करुन आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष रावसाहेब घिगे यांनी केले. लिलाव दरम्यान उपसभापती संतोष म्हस्के, सचिव अभय भिसे, सहसचिव सचिन सातपुते, विभागप्रमुख कराळे हे उपस्थित होते.
नगर बाजार समितीत मुगाला ७ हजाराचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST