शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! म्हशींच्या जोडीची किंमत २ लाख ४१ हजार; घोडेगावच्या बाजारात झाली विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:52 IST

जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील आठवडे बाजारात शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली.

ठळक मुद्देशुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली.या दोन म्हशी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील बागायतदार एकनाथ साळे यांनी खरेदी केल्या.म्हशीच्या बाजारातील जुने जाणते नाव असलेले कै. बबनराव बर्डे यांचे चिरंजीव रवींद्र बर्डे यांच्या दावणीवरून म्हसाण जातीच्या दोन म्हशींची विक्री झाली.

घोडेगाव : जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील आठवडे बाजारात शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. या दोन म्हशी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील बागायतदार एकनाथ साळे यांनी खरेदी केल्या. बाजारातील अलीकडील हा विक्रम समजला जातो.देशभरातून घोडेगावच्या म्हशीच्या बाजारात जातिवंत म्हशींची खरेदी व विक्री होते. म्हसाण, मु-हा, जाफराबादी, गावरान, पंढरपुरी अशा म्हशींच्या जाती खरेदी-विक्रीसाठी येतात. शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीचा खरेदी-विक्रीचा उच्चांक मोडला गेला. म्हशीच्या बाजारातील जुने जाणते नाव असलेले कै. बबनराव बर्डे यांचे चिरंजीव रवींद्र बर्डे यांच्या दावणीवरून म्हसाण जातीच्या दोन म्हशींची विक्री झाली. म्हशी जातिवंत आहेत. सडाला चांगल्या आहेत. दूध ही जास्तच आहे. रंग काळाकुट्ट, कुठेही डाग नाही. कुठल्याही प्रकारची खोड नसल्याने व धष्टपुष्ट शरीरयष्टी आणि सर्वगुणी असल्याने विक्रमी किमतीला विक्री झाली असल्याचे बर्डे यांनी सांगितले.नगर जिल्ह्यातील नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा घोडेगाव उपबाजार जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारासाठी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाना, दिल्ली, गुजरात, आंध्र, कर्नाटक, केरळ येथून व्यापारी व खरेदीदार येतात.विक्रमी दरात म्हशींची विक्री झाल्याचे समजताच बर्डे यांनी खरेदी केलेल्या या म्हशी पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. म्हशींचे खरेदीदार रवींद्र बर्डे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप बर्डे, दादा पा. दरंदले, बबनराव भोसले, शब्बीरभाई शेख उपस्थित होते.

मी तर लक्ष्मी जोडाच संक्रांतीच्या मुहूर्तावर घरी चालवला आहे. आजपर्यंत माझ्याकडे असा लक्ष्मीचा जोडा नव्हता. आता माझ्या दारात या म्हशींच्या रूपाने लक्ष्मीच अवतरणार आहे.-एकनाथ साळे, म्हशींचे खरेदीदार

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा