शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव दुहेरी खून प्रकरणात पोलिसांवर शिवसेनेचे अनिल राठोड यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 18:47 IST

अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीदरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलिसांवर दबाव आणत आहेत.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांनी वाचून दाखविले पोलीस अधिक्षकांनी महासंचालकांना लिहिलेले पत्र

नागपूर : अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीदरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलिसांवर दबाव आणत आहेत. शहरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्यास कारणभूत असून ते टोकाची भूमिका घेण्याची शक्यता आहे. अशा आशयाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पोलीस महासंचालकांना पाठविले होत, असा  गौप्यस्फोट करीत  पाठविलेल्या पत्राचे वाचन विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत  केले. यावर शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. यावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांत खडाजंगी उडाली.  कोतकर व ठुबे यांच्या खून प्रकरणातील आरोपी स्थानिक लोकप्रतिनिधी यांची जामीनावर मुक्तता झाल्याने सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत शिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या प्रकरणात अतिरिक्त चार्ज सिट दाखल करण्यात यावी, तसेच सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे अनील परब यांनी केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली. धनंजय मुुंडे म्हणाले, हा निदंनीय प्रकार आहे. पोलिसांवर शिवसेना नेत्यांचा कशाप्रकारे दबाव होता. या प्रकरणातील खरे आरोपी कोण आहेत. हे पोलीस अधिक्षकांनी पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट होते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या प्रकरणात जावीपूर्वक खोटा गुन्हा दाखल करायला लावला. पोलीस अधिक्षकांनी महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात अनिल राठोड यांनी यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा उल्लेख केला आहे.  आमदार संग्राम जगताप यांना हकनाक गोवण्यात आल्याचा आरोप करून या पत्राची चौकशी करून यातील दोषीवर कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली. यावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी उडाली. आरोप-प्रत्यारोप झाले. अनिल परब यांनी पत्र वाचण्यावर आक्षेप घेतला.  गोंधळामुळे तालिका सभापती गिरीश व्यास यांनी कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब केले. कामाजाला सुरुवात झाल्यानंतर मुंडे यांनी पुन्हा पत्र वाचायला सुरुवात केली. यावर मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिक्षकांनी जो अहवाल पाठविला आहे. तो तपासून निश्चित कारवाई कण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड