शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त कळसची शाळा भरते मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 17:41 IST

अळकुटी : पारनेर तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कळस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चक्क मंदिरात, सभामंडपात, पडवीत, झाडाखाली तर ...

अळकुटी : पारनेर तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कळस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चक्क मंदिरात, सभामंडपात, पडवीत, झाडाखाली तर कधी उघड्यावर भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे़ या शाळेच्या दहा वर्गखोल्या मोडकळीस आले आहेत़कळसच्या शाळेत १७१ विद्यार्थी असून, ८ शिक्षक येथे ज्ञानदानाचे काम करीत आहेत़ सध्या ही शाळाच मोडकळीस आली आहे़ त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मंदिरात, सभामंडपात, पडवीत, झाडाखाली तर कधी उघड्यावर बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ विशेष म्हणजे गावाचा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आदर्श पुरस्काराने सन्मान झाला. त्याशिवाय संत गाडगेबाबा पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, जिल्ह्यात सलग ३ वर्षे ग्रामस्वच्छता पुरस्कार, जिल्ह्यात हागणदारीमुक्तीत तिसरा व दुसरा पुरस्कार अशा पुरस्कारांनी गावाचा सन्मान करण्यात आला आहे़ परंतु आता याच गावात विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण घेता येईल, अशी परिस्थिती राहिली नाही़ गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था होऊन इमारत मोडकळीस आलेली आहे़ शाळेची इमारत कधी कोसळेल याचा भरोसा नाही़ त्यामुळे शिक्षकही या शाळेत विद्यार्थ्यांना बसविण्याचे धाडस करीत नाहीत़ विद्यार्थ्यांना मंदिराच्या पडवीत, सभामंडपात, झाडाखाली, मोकळ्या मैदानात वर्ग भरवून शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गाव आदर्श झाले़ मात्र शाळेच्या प्रश्नाबाबतच हलगर्जीपणाचा ‘कळस’ का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे़