शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:23 IST

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

अहमदनगर : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.हंगामाच्या प्रारंभीच ऊस दराचे आंदोलन पेटले असले तरी कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत सुरू झाला आहे. आजारातून सावरलेल्या राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असला तरी परवाना न मिळाल्याने या कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही. त्यांचा ५ डिसेंबरला गाळप सुरू होणार आहे. एफ. आर.पी. थकबाकीमुळे साईकृपा-२ सुरू झालेला नाही. कोपरगावच्या संजीवनी कारखान्याने ७५ हजार ८८१.२२ मे. टन उसाचे गाळप करून ६० हजार ५२५क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. काळे कारखान्याने ७५ हजार ५६९.०४ मे.टन गाळपातून ६२ हजार२०० क्विं., गणेश कारखान्याने २७ हजार ५० मे.टन गाळप करून १९ हजार ४७५ क्विं., अशोक ५५ हजार ७३० मे.टन गाळपातून ४२ हजार ८५० क्विं., विखे ६२ हजार ७०० मे.टन गाळपातून ५२ हजार ९०० क्विं., श्रीगोंदा कारखान्याने ९० हजार ५५५.७३ मे.टन गाळपातून ८२ हजार ७५० क्विं., थोरात कारखान्याने १ लाख ३९ हजार १४० मे.टन गाळपातून १ लाख २१ हजार ४७० क्विं., ज्ञानेश्वर कारखान्याने ९५ हजार ३० मे.टन ७३ हजार ८०० क्विं., वृद्धेश्वर कारखान्याने ५१ हजार ४१५ मे.टन ३९ हजार ३५० क्विं., मुळा कारखान्याने ९५ हजार ३२० मे.टनातून ७८ हजार ६५० क्विं., अगस्ती कारखान्याने ६९ हजार ५२३.८८ मे. टनातून ५६ हजार ८४० क्विं., कुकडी ९१ हजार ८०० मे.टनातून ८० हजार ६५० क्विं., क्रांती शुगर (पारनेर)३० हजार ७१५ मे.टनातून २५ हजार ९०० क्विं., पीयूष शुगर(नगर) २५ हजार ३२० मे.टन १३ हजार ५०० क्विं., अंबालिका कारखान्याने २ लाख १३ हजार २८५मे.टनातून १ लाख ९९ हजार ५५० क्विं., गंगामाई (शेवगाव) १ लाख १५ हजार ६०५ मे.टनातून ८६ हजार २८० क्विं., साईकृपा-१ने ३८ हजार ८९५ मे.टनातून ३८ हजार ५०० क्विं., प्रसाद शुगर ५४ हजार ९६० मे.टनातून ४३ हजार ४०० क्विंटल, जय श्रीराम शुगरने ३३ हजार ७३८ मे.टनातून २४ हजार ७१० क्विंटल़अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सहकारी व खाजगी अशा जिल्ह्यातील दोन्ही प्रकारच्या १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने