शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

शिक्षक बदल्यांची तयारी सुरू, मात्र आचारसंहिता आडवी येणार

By चंद्रकांत शेळके | Updated: March 15, 2024 18:43 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १२ मार्च रोजी पवित्र पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या १४३ शिक्षकांना नियुक्त्या दिल्या.

अहमदनगर : पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, या शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभागाच्या आदेशाला बगल देत प्राथमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या शिक्षकांना पदस्थापना दिली. त्यानंतर तीन दिवसांनी आता बदलीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र या बदल्यांत आचारसंहितेत अडसर येणार असून लोकसभेनंतर बदल्यांना मुहूर्त लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १२ मार्च रोजी पवित्र पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या १४३ शिक्षकांना नियुक्त्या दिल्या. मात्र शासन निर्णयानुसार आधी जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया होणे गरजेचे होते, अशी शिक्षक संघटनांची मागणी होती. शालेय शिक्षण विभागाने ६ मार्चला व नंतर ग्रामविकास विभागाने ११ मार्च २०२४ ला तसे पत्र काढून शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची संधी देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कळवले होते. मात्र या पत्राला बगल देत शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या १४३ शिक्षकांना नियुुक्या दिल्या. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा काहिशा भरल्या असल्या तरी कार्यरत शिक्षकांना नियमाप्रमाणे बदलीची संधी देणे गरजेचे होते, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आता तीन दिवसांनंतर शिक्षण विभागाने शालेय शिक्षण व ग्रामविकास अशा दोन्ही विभागांच्या पत्राची दखल घेत बदल्यांची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी १४ मार्च रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळवून विनंती बदल्यांच्या अनुषंगाने शिक्षकांचे अर्च व आवश्यक माहिती संकलित करण्यास सांगितले आहे. परंतु आता एक-दोन दिवसांत लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने या बदल्या निवडणुकीनंतर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

तोपर्यंत करता येणार बदल्यांची तयारीआचारसंहितेत बदल्या होणार नसल्या तरी बदल्यांची आवश्यक ती तयारी या काळात तालुकास्तरावर करता येणार आहे. केंद्रप्रमुखांनी बदलीसाठी इच्छूक शिक्षकांचे अर्ज मागवून घेणे, तसेच संवर्ग १ व २ मध्ये बदलीची मागणी असेल तर प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे, सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, त्यावर हरकती घेऊन यादी अंतिम करणे ही तयारी या काळात होऊ शकते. त्यामुळे आचारसंहितेनंतर लगेच बदल्यांची प्रक्रिया राबवता येऊ शकते. त्या अनुषंगानेच शिक्षक विभागाने हे पत्र काढले असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Transferबदली