शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

क्वारंटाईनमध्ये पोलीस दलातील गर्भवती महिलेने पालटले शाळेचे रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 11:09 IST

मुंबईतून गावी बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथे परतलेल्या एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन असताना विविध कामे करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूपडे पालटले. विशेष म्हणजे ही महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. या कामात तिच्या पतीनेही मदत केली.

बाळासाहेब काकडे  । श्रीगोंदा : मुंबईतून गावी बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथे परतलेल्या एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन असताना विविध कामे करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूपडे पालटले. विशेष म्हणजे ही महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. या कामात तिच्या पतीनेही मदत केली. क्वारंटाईन काळात त्या महिलेने केलेल्या कामाचे ग्रामस्थ, शिक्षकांनी कौतुक केले आहे.रेखा दीपक ढवळे या मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल आहेत. त्यांचे पती दीपक बाळासाहेब ढवळे मुंबईत भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. रेखा ढवळे यांनी गरोदरपणाचा आठवा महिना संपल्यानंतर बाळंतपणासाठी रजा घेतली. त्या पतीसोबत गावी बेलवंडी येथे परतल्या. कुटुंबाच्या व गावाच्या हितासाठी घरी न जाता त्या श्रीकृष्ण मळ्यातील शाळेत क्वारंटाईन झाल्या. या काळातही त्यांनी आराम न करता सामाजिक जाणीवेतून पतीच्या मदतीने शाळेचे रूपडे पालटायचे ठरविले. त्यांनी तेथे आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच कामाला सुरुवात केली. सुट्टीत शाळेसमोर साचलेला कचरा, वाळलेली पाने, धूळ साचलेल्या भिंती, पडवीतला कचरा काढण्याचे काम सुरू केले. शाळा व परिसर स्वच्छ केला. शाळा परिसरात लावलेल्या झाडांना वाफे तयार करून सुकलेल्या झाडांना पाणी सोडले. असे एक नाही, तर सलग पंधरा दिवस त्यांचा नित्यक्रम सुरू होता. त्यामुळे झाडे पूर्वीसारखी टवटवीत झाली. झाडे बहरून गेली. तेथे पक्षीही येऊ लागले. त्यांचा किलबिलाट सुरू झाला. पक्ष्यांना पाण्यासाठी जागोजागी झाडावर पाण्यासाठी ग्लास बांधले. बाहेरून आलेले नागरिक सहजरित्या क्वारंटाईन होत नाहीत. अशा स्थितीत ढवळे दाम्पत्य स्वत:हून क्वारंटाईन झाले. रेखा ढवळे यांनी गर्भवती असतानाही केलेल्या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. दिलगिरी अन् सलाम..गर्भवती असूनही रेखा ढवळे या शाळेत क्वारंटाईन झाल्या. त्याबद्दल कोरोना ग्राम समितीच्या सदस्यांनी ढवळे यांचा शाळेत जाऊन सत्कार केला आणि दिलगिरी व्यक्त केली. ढवळे दाम्पत्याने क्वारंटाईन काळात शाळेत केलेले काम पाहून मुख्याध्यापिका छबाबाई जाधव, सहशिक्षिका मोरे  यांनी त्यांना सलाम केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसWomenमहिला