अहमदनगर : रथसप्तमीनिमित्त रविवारी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्यावतीने महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पारंपरिक वेशभूषा परिधान करीत महिलांनी विविध कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
या कार्यक्रमास नगरसेविका शीतल जगताप, वैशाली ससे, रेश्मा आठरे, ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, उपाध्यक्षा अनिता काळे, पुष्पा मालू, डॉ. योगिता सत्रे, शकुंतला जाधव, मनिषा देवकर, शोभा पोखरणा, शोभा झंवर, दीप्ती मुंदडा, दीपा मालू, शशीकला झरेकर, आशा गायकवाड आदी महिला सदस्या उपस्थित होत्या. अनिता काळे यांनी प्रास्ताविक केले. अलका मुंदडा यांनी स्वागत केले. निष्ठा सुपेकर हिने स्वागत गीत सादर केले.
यावेळी नगरसेविका शीतल जगताप म्हणाल्या, हळदी-कुंकू कार्यक्रमात विचारांचे वाण सर्वश्रेष्ठ आहे. या कार्यक्रमाद्वारे महिला एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात. ज्येष्ठ महिला कुटुंबाचा कणा आहेत. ज्या समाजात महिलांना सन्मान आहे, तो समाज प्रगतीपथावर आहे. ज्योतिषतज्ज्ञ अभिलाषा यांनी महिलांना वास्तूशास्त्र, हस्तरेषा, अंक शास्त्राची माहिती दिली. या कार्यक्रमात दीपा मालू यांनी बौध्दिक, तंबोला व उखाणे स्पर्धांसह सामान्य ज्ञानसह विविध बौध्दिक व मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या. यामध्ये शारदा नहार, कुसूम सिंग, स्वाती नागोरी, तारा लड्डा, राखी खिवंसरा यांनी बक्षिस पटकाविले. विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा झंवर यांनी केले. दीप्ती मुंदडा यांनी आभार मानले.
------
फोटो- २५ प्रयास ग्रुप
रथसप्तमीनिमित्त प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्यावतीने झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करतांना नगरसेविका शीतल जगताप समवेत ज्योतिषतज्ज्ञ अभिलाषा, वैशाली ससे, रेश्मा आठरे, अलका मुंदडा, अनिता काळे, पुष्पा मालू, डॉ. योगिता सत्रे आदी.