शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

पाथर्डीमध्ये प्रताप ढाकणेंचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 15:13 IST

स्व.गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांचा नाईक चौकात रास्ता-रोको करीत पुतळा जाळला.

पाथर्डी : स्व.गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांचा नाईक चौकात रास्ता-रोको करीत पुतळा जाळला. यावेळी कार्यकर्त्यानी ढाकणेंच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.प्रताप ढाकणे यांनी काल पत्रकार परीषद घेऊन वंजारी समाज आरक्षण, ऊस तोडणी कामगारांच्या आंदोलनाबाबत आपली भूमीका मांडली होती. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज दुपारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाईक चौकात जमा झाले. प्रताप ढाकणे यांचा निषेध करीत त्यांचा पुतळा जाळत रास्ता रोको आंदोलन केले.सोमनाथ खेडकर म्हणाले, ढाकणे हे वाचाळ असून लबाड राजकारणी आहेत. भाजपमध्ये त्यांना आणायला आम्ही पुढाकार घेतला होता. परंतु चर्चेच्या वेळी आम्हाला बाहेर थांबा, असे सांगितल्याने ते किती लबाड आहेत, हे कळते. वंजारी समाजाचे खरे कल्याण स्व.गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरूध्द अपशब्द आम्ही खपवून घेणार नाहीत. येळीचे सरपंच संजय बडे म्हणाले, वंजारी समाजाला आरक्षण १९९४ ला मिळाले. मुंडे यांच्या विरूध्द बोलल्यामुळे राष्ट्रवादी आपल्याला काहीतरी देईल, या हेतूने त्यांनी हा प्रकार केला आहे. मुंडेंची बदनामी आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी तालुकाघ्यक्ष माणिक खेडकर, महिला आघाडीच्या काशीबाई गोल्हार, भगवान साठे यांची भाषणे झाली.आंदोलनात माजी जिल्हा परीषद सदस्य सोमनाथ खेडकर , उपसभापती विष्णूपंत अकोलकर भाजपचे तालुकाघ्यक्ष माणिकराव खेडकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा काशीबाई गोल्हार, येळीचे सरपंच संजय बडे, उपनगराघ्यक्ष बजरंग घोडके, युवा नेते मुकूंद गर्जे, शहराध्यक्ष अजय भंडारी, नगरसेवक नामदेव लबडे, नगरसेविका मंगलताई कोकाटे, मनिषा घुले, जमीर आतार, बाळासाहेब गोल्हार, संजय किर्तणे, माजी जिल्हा परीषद सदस्य भगवान साठे आदिंसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर