कर्जत: तालुक्यातील बारडगाव सुद्रिक सेवा संस्थेत सत्ता परिवर्तन झाले असून सभासदांनी युवकांना संधी दिली आहे़ या संस्थेच्या स्थापनेपासून प्रथमच सत्ता परिवर्तन झाले आहे़ संस्थेच्या तेरा जागांसाठी २६ जुन रोजी मतदान झाले होते़ या निवडणुकीबाबत विरोधकांनी न्यायालयात दाद मागितली होती या मुळे निकाल जाहीर करण्यात आला नव्हता़ औरंगाबाद खंडपीठाचे निर्णयानंतर रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. कर्जत येथील सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात ही मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत माजी उपसभापती डॉ. सुनील गावडे. बारडगाव सुद्रिकचे उपसरपंच संजय सुद्रिक, नाना पानडूळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला तेरा पैकी बारा जागा मिळाल्या तर सत्ताधारी पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांमध्ये दिपक सुद्रिक, दिलीप गावडे, लालासाहेब ससते, भाऊसाहेब सुद्रिक, सुभाष गावडे, दिगंबर दराडे, मोहन कांबळे, महेंद्र सुद्रिक, मकाजी साबळे, मालन काळे, राजाबाई सुद्रिक, भास्कर गावडे, किसन बरकडे यांचा समावेश आहे़ निवडणूक निर्णय अधिकारी टी.एस.भोसले यांनी निवडणूक निकाल जाहीर केल्या नंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी एकच जल्लोष करून आनंद साजरा केला. विजयी उमेदवारांची बारडगाव सुद्रिक येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.
बारडगाव सुद्रिक सेवा संस्थेत सत्ता परिवर्तन
By admin | Updated: November 7, 2016 00:51 IST