शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

"पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 21:27 IST

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक प्रचार रणधुमाळीत आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे आहे, असा आरोप केला आहे.

श्रीगोंदा ( जि. अहमदनगर) : श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक प्रचार रणधुमाळीत आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे आहे, असा आरोप केला आहे. या आरोपाबाबत भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लेखी पत्र पाठवून आपल्या आमदारांना आवर घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान तिसरी आघाडी मैदानात असल्याने श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. सेनेच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत आहे. शिंदे यांनी खा. पत्रात म्हटले आहे, श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मला उमेदवारी दिली आहे. प्रचारात आ. जगताप यांनी वरील विधान करून महिला वर्गाचा अपमान केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महिलांचे सक्षमीकरण,सबलीकरण व महिलांचा मान सन्मान वाढविण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडली आहे. अशा स्थितीत आ. जगताप यांनी केलेले विधान नक्कीच शरद पवार यांना खटकणारे आहे. तुम्ही आपल्या आमदाराला या विधानावर समज देण्याची गरज आहे. ---माघारीसाठी ३५ लाखांची ऑफरश्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार सिराजबी कुरेशी यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्यासाठी ३५ लाख रूपयांची ऑफर आली होती. परंतु संभाजी ब्रिगेडने कुरेशी यांची उमेदवारी कायम ठेऊन जातीय राजकारणाची समीकरणे मोडून काढली आहेत, असा दावा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केला आहे.  सेनेच्या उमेदवारांची माघार श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत सेनेने नगराध्यक्षपदासाठी विद्या आनंदकर व मिनल भिंताडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्ष उमेदवारी कोणाची ठेवावी यावर वेगवेगळ्या पध्दतीने चर्चा होती. निवडणुकीत जातीय राजकारणाचा घाणेरडेपणा पाहावयास मिळाला, असे शेलार म्हणाले.-------मी काही कोणाचे नाव घेऊन बोललो नाही. चित्रपटाचे नाव घेऊन बोललो. कोणाची बदनामी करण्याचा माझा उद्देश नव्हता. जर कोणाला माझे शब्द जिव्हारी लागले असतील तर माझाही नाईलाज आहे.- आ. राहुल जगताप (राष्ट्रवादी)---१९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणातनगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवकपदाच्या १९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १६२ पैकी ८८ जणांनी निवडणूक मैदान सोडले. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे, भाजपच्या सुनीता शिंदे, संभाजी ब्रिगेडच्या सिराजबी कुरेशी यांच्यात तिरंगी लढत होईल.