शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भिडे यांच्या रुपाने द्वेषाचे राजकारण, प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:44 IST

संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

तिसगाव (जि. अहमदनगर) - संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे रविवारी राज्यस्तरीय भटक्या विमुक्तांच्या चिंतन परिषदेच्या समारोप झाला. आंबेडकर अध्यक्षस्थानी होते. विधिज्ञ विजय मोरे व मानवेंद्र वैदू, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, स्मिता पानसरे आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, पक्षांतर्गत हुकुमशाही घातक असल्याचे सांगत आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही अप्रत्यक्ष हल्ला केला. सध्याच्या समाजव्यवस्थेत एकमेकांबद्दल गैरसमज व संशयाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. त्याचा मुकाबलाही आता एकत्रितपणे करावा लागेल. सध्या प्रस्थापित भाजपाचा एक मार्ग, तर बाबासाहेबांच्या विचारांचा दुसरा मार्ग समोर आहे. चौरस्त्यावर थांबण्याचा व थांबणाऱ्यांचा काळ आता संपला आहे. राजेशाहीत भटक्या विमुक्तांना स्थान नव्हते. लोकशाहीत ते स्थान बाबासाहेबांचे विचार व संविधानाने दिले. त्याअनुरूप न्याय व हक्क मिळण्यासाठी राज्याच्या व्यवस्थेचा भाग बनणे हाच चळवळीचा एकमेव अजेंडा आता असला पाहिजे. सत्तेचा हिस्सा होण्यासाठी २८८ जागा मिळविण्यासाठी आता प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.प्रत्येक वर्षी मढी यात्रेनंतर राज्यातील भटक्या विमुक्तांची परिषद मढी येथील कानिफनाथांच्या भूमीत घेतली जाईल, असे संयोजक प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी