दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करत २३ एप्रिलपासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती केली आहे. आवश्यक कारण असेल तरच पोलिसांकडून पास देण्यात येतो. हॉस्पिटलमध्ये अथवा जवळच्या नातेवाइकाच्या अंत्यविधीला जायचे असेल तर पोलीस तत्काळ पासला मंजुरी देतात. आवश्यक ती कागदपत्र जोडलेले असेल तर बारा तासांच्या आत पास दिला जातो. अर्ज करणाऱ्यांपैकी बहुतांशी जण लग्नाला जायचे आहे, नातेवाइकांना भेटायला जायचे आहे, अशी शुल्लक कारणे नमूद करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनावश्यक कारण नमूद असल्यावर तो अर्ज रद्द केला जातो. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर विभागामार्फत अर्जाची छाननी करून ई-पास दिला जातो. दिवसाला ५५० ते ६०० पास सध्या दिले जात आहेत.
.........
ई-पाससाठी योग्य कारण व आवश्यक ती कागदपत्र डाऊनलोड केलेली असतील तर पोलिसांकडून तत्काळ पास दिला जातो. बहुतांशी जण शुल्लक कारण नमूद करून पासची मागणी करतात. त्यामुळे ज्यांना अत्यावश्यक कामासाठी प्रवासाची आवश्यकता आहे. त्यांनीच पास घेण्यासाठी साठी अर्ज करावा.
- प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक-सायबर पोलीस स्टेशन