शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हार खुर्दमध्ये घरात घुसला बिबट्या, १४ तासानंतर बिबटया जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:20 IST

राहुरी : कोल्हार खुर्द येथील परिगाबाई खर्डे यांच्या घरात चक्क बिबट्यानेच घरोबा केल्यामुळे मोठा खळबळ उडाली. ही माहिती वा-यासारखी सर्वत्र ...

राहुरी : कोल्हार खुर्द येथील परिगाबाई खर्डे यांच्या घरात चक्क बिबट्यानेच घरोबा केल्यामुळे मोठा खळबळ उडाली. ही माहिती वा-यासारखी सर्वत्र पसरली अन् वन खात्याचे राहुरी, नगर व नाशिक येथील पथके खर्डे यांच्या घरी दाखल झाली. तब्बत १४ तासानंतर शुक्रवारी दुपारी बिबट्या पिंज-यात जेरबंद झाला. जेरबंद झालेल्या बिबट्याला डिग्रस (ता़ राहुरी) येथील शासकीय नर्सरीत रवाना करण्यात आले.कोल्हार खुर्द परिसरात असलेल्या मुंजाबानगर येथील भरवस्तीत असलेल्या परिगाबाई खर्डे यांच्या घरात बिबट्या घुसला़ त्यामुळे खर्डे यांनी घराला कुलुप लावून बिबट्याला कोंडून घेतले़ समोरून असलेली खिडकी वन विभागाच्या कर्मचा-यांनी पॅक केली. राहुरीचे वनक्षेत्रपाल उमेश वाघ यांनी अहमदनगर येथील उपवनसंरक्षक ए़ श्री़ लक्ष्मी व आऱ जी़ देवखिळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.शुक्रवारी पहाटे जुन्नरवरून डॉक्टरांचे पथक कोल्हार खुर्द येथे दाखल झाले. ए़ श्री़ लक्ष्मी या घटनास्थळी दाखल झाल्या़ वन खात्याच्या कर्मचा-यांनी घराचे पत्रे खोलले. तरीदेखील बिबट्या बाहेर येण्याचे टाळत होता़ अखेर वन खात्याने बिबट्यावर पाण्याची फवारणी केली़ त्यानंतर बिबट्या पिंज-यात जेरबंद झाला़राहुरी तालुक्यात बागायती पट्ट्यात उसामध्ये बिबट्याचे वास्तव्य आहे़ गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे़ शेतक-यांची जनावरे फस्त करणारा बिबट्या पहिल्यांदाच भरवस्तीत असलेल्या घरात घुसला़ त्यामुळे परिसरात घबराट पसरली़ बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ बिबट्या सुखरूप असल्याची माहिती वन विभागाचे लोंढे यांनी दिली.

असा झाला बिबट्या जेरबंद..घराच्या दरवाजासमोर रिकामा पिंजरा ठेवण्यात आला़ पिंज-याचा दरवाजा उघडण्यात आला़ घरामध्ये पाणी सोडण्यात आले़ पाण्यामुळे चवताळलेला बिबट्या थेट दरवाजातून बाहेर पडून अलगद पिंज-यात अडकला़ पिंज-यात बिबट्या जेरबंद होताच वन कर्मचाºयांचा जीव भांड्यात पडला.परिगाबाई खर्डे या वृद्धा घरात असतानाच बिबट्याच त्यांच्या घरात घुसला़ बिबट्याची चाहूल लागताच खर्डे यांनी बिबट्याची नजर चुकवून घराबाहेर धाव घेतली व आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. घरात बिबट्या पाहून त्यांनी दरवाजा बंद करुन कुलूप लावले. त्यानंतर वन कर्मचारी तेथे आले.