यावेळी सरपंच अलका इथापे, उपसरपंच संजय साळवे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब साळवे, माजी सरपंच संजय मगर, सदस्य यदू पवार, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब गोसावी, बाळासाहेब जाधव, दत्तू कदम, संदीप मगर, राहुल मगर, राहुल भारती, निखिल मगर, स्वप्निल गोसावी, तुषार इथापे, गौरव पवार, शशिकांत काळे, स्वप्निल शेळके आदी उपस्थित होते. गावामध्ये ग्रामस्थांच्या मदतीने माळरानावर वृक्षारोपण करण्यात आले. त्याचे संगोपन करण्यात येईल, असे आश्वासन सरपंच अलका इथापे यांनी दिले. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपनाची जबाबदारी स्वीकारली, तर हरितक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, असे उपसरपंच संजय साळवे म्हणाले.
--------
फोटो - ०५कोंडेगव्हाण वृक्षारोपण
कोंडेगव्हाण येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने युवकांनी गावाच्या माळरानावर वृक्षरोपण केले.