श्रीरामपूर : कार्टून्स कट्टा या हास्य व्यंगचित्रकारांच्या ग्रुपने देशभरातील चित्रकारांच्या गणेश चित्रांच्या ऑनलाइन प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यात येथील येथील चित्रकार रवी भागवत यांच्या चित्रांचीही निवड करण्यात आली आहे.
नगर येथील प्रमोद कांबळे, पुणे येथील घनश्याम देशमुख यांच्यासह देशभरातील शंभरहून अधिक चित्रकारांचा या प्रदर्शनात सहभाग आहे. चित्रकारांच्या ५० हून अधिक शैली व माध्यमांमध्ये साकारलेल्या गणेश चित्रांचा आनंद कला रसिकांना घेता येणार आहे. फेसबूक पेजवरही कलारसिक भेट देऊन प्रदर्शनाचा आनंद घेऊ शकतात.
चित्रकार भागवत यांनी साकारलेल्या १८ इंच बाय २४ इंच आकाराचे सॉफ्ट पेस्टल्स ऑन टिंटेड पेपर या माध्यमातील ‘श्री’ या नावाच्या गणेश चित्राची निवड समितीने केली आहे. भागवत गेल्या २० वर्षांपासून चित्रकला व व्यंगचित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. ११ विविध माध्यमांमध्ये चित्र काढण्याचा त्यांना अनुभव असून भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हजारो चित्रे रेखाटली आहेत.
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम यांनीही भागवत यांच्या कलेला दाद दिली होती. नगर, पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, नागपूर आदी ठिकाणी चित्र तसेच व्यंगचित्रांची प्रदर्शने भरली आहेत.
-------