शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नगर-औरंगाबाद रोडवर पेट्रोल पंप लुटला; एकावर सशस्त्र हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:13 IST

नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव पसिरात शुक्रवारी पहाटे एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लूट केली. पंपावरील कर्मचा-याकडून रोख रक्कम, व मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी एका वाहन चालकावर हल्ला करुन त्यास जखमी केले. चोरट्यांनी किती रोकड चोरुन नेली हे मात्र समजू शकले नाही. 

घोडेगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव पसिरात शुक्रवारी पहाटे एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लूट केली. पंपावरील कर्मचा-याकडून रोख रक्कम, व मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी एका वाहन चालकावर हल्ला करुन त्यास जखमी केले. चोरट्यांनी किती रोकड चोरुन नेली हे मात्र समजू शकले नाही.  नगर-औरंगाबाद मार्गावर घोडेगावपासून नगरकडे साधारण दोन किलोमीटर अंतरावर पागीरे यांचा मे मनिषा पेट्रोलियम हा पंप आहे. शुक्रवारी पहाटे नगरकडून मोटारसायकलवर दहा ते बारा जण आले. पँट, शर्ट घातलेल्या व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. तर हातात कोयते, कु-हाडी, तलवारी, गलोल अशी हत्यारे होती. पंपावरील कामगारांना हत्याराचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. व्यवस्थापक केबीनमध्ये नेऊन टेबलाच्या ड्रावरमधील रक्कम काढून घेतली. काहींचे मोबाईल हिसकावून घेतले. पंपावर काही ट्रक, टेम्पो, जीप ट्रेलर मुक्कामी थांबले होते. त्यातील काही गाड्यांच्या काचा फोडून चालकांना मारहाण करुन त्यांची रक्कम लुटली. दोन कामगार, एक वाहन चालकास मारहाण करण्यात आली. त्यातील वाहनचालकावर कोयत्याचा वार हातावर लागल्याने तो जखमी झाला आहे. जखमीस शनीशिंगणापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  घटनास्थळी शेवगावचे  पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे, नेवासाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, सोनईचे पोलीस उपनिरीक्षक जनार्दन सोनवणे,श्वान पथक, ठसे तज्ञांचे पथक दाखल झाले. चोरटे येथील सीसीटिव्ही कॅमेºयात कैद झाले असले तरी त्यांची वाहने मात्र दिसत नाहीत. ऐन साखर झोपेत पंपावर लुट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुभाष कांबळे हा चालक पिकअप जीपसह पंपावर थांबला होता. त्याच्या गाडीच्या काचा फोडून त्यास हत्याराचा धाक दाखवून त्याचे सहा हजार रुपये लुटले. परंतु कांबळे याने साहेब माझे सगळेच पैसे चालवले. मला टोलनाक्याला पैसे द्या. नाहीतर मी कसा जाणार? असा सवाल केला. मला टोलनाक्यासाठी दोनशे रुपये तरी द्या विनवणी केल्यावर त्याला चोरट्यांनी दोनशे रुपये देऊन माणुसकी जागविली. 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपtheftचोरी