संगमनेर : शहरातील सर डी. एम. पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी (दि. २) शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य आर. एल. पगारे होते. यावेळी अधीक्षक प्रा. शशांक गंधे, प्रा. जे. टी. आहेर, शिक्षक-पालक समितीचे प्रमुख प्रा. गुलाब गायकवाड आदी उपस्थित होते. या सभेत शिक्षक-पालक कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत प्राचार्य पगारे (अध्यक्ष), सुनंदा गोडसे (उपाध्यक्ष), प्रा. आहेर (सचिव), प्रा. गायकवाड (सहसचिव) तर सदस्य म्हणून विलास गवळी, प्रा. सुनीता वलवे, सुनीता खरात, प्रा. एस. व्ही. विखे, तरन्नुम पठाण, प्रा. भाऊसाहेब मांढरे, रतन बेदवे, प्रा. दशरथ गभाले, हर्षदा मेहत्रे, प्रा. एन. ए. शिंदे, रोहिणी व्यवहारे, प्रा. एस. व्ही. शिंदे, सुनंदा गोडसे यांची निवड करण्यात आली.
‘पेटिट’ची शिक्षक-पालक कार्यकारिणी जाहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST