श्रीगोंदा( जिल्हा अहिल्यानगर): पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एका दिंडीतील घोडा चोरी प्रकरणी आकाश उल्हारे (रा. घोगरगाव) याला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही घटना बुधवारी रात्री घडली. गुरुवारी सकाळी पोलिसांनी आकाश उल्हारे याला चोरलेल्या घोड्यासह ताब्यात घेतले. सदरचा घोडा संबधीत दिंडी चालकास दिला आणि आकाश उल्हारे याला जेलची हवा दाखविली.
हा घोडा श्रीरामपूर येथील विकास परदेशी यांच्या मालकीचा असुन एका दिंडी साठी त्यांनी दिला होता. ही दिंडी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झाली आहे.
चोरीला गेलेला घोडा संस्थानचा नाही, कोणत्या दिंडीतील आहे हे माहित नाही, अशी प्रतिक्रिया संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख नवनाथ महाराज गांगर्डे यांनी दिली.