शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

छळ इथला संपत नाही

By मिलिंदकुमार साळवे | Updated: August 18, 2017 19:53 IST

अहमदनगर : अकोल्यापासून जामखेड. पाथर्डीपासून कोपरगाव. अशा जिल्हाभरातील अपंगांना जिल्हा शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्रच नाही तर साधी एक सही घ्यायची ...

ठळक मुद्देसिव्हील हॉस्पिटल : बुधवार ठरतोय अपंगांचा छळवारजिल्हा रूग्णालयात अपंगांचा छळ

अहमदनगर : अकोल्यापासून जामखेड. पाथर्डीपासून कोपरगाव. अशा जिल्हाभरातील अपंगांना जिल्हा शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्रच नाही तर साधी एक सही घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी अहमदनगरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाने (सिव्हील हॉस्पिटल) बुधवार ठरवून दिलेला आहे. पण हाच ‘सिव्हील’चा बुधवार जिल्हाभरातून येणाºया अपंगांसाठी छळवार ठरतोय. बुधवार १६ आॅगस्टला ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये जिल्हा रूग्णालयात अपंगांचा छळ कसा होतो, हे दिसलं.रामभाऊ डमाळे. श्रीरामपूरच्या गोंधवणी भागातून आलेले. दोन्ही पायांनी ते अपंग. त्यामुळे पूर्णपणे खरडत खरडतच त्यांना एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जावं लागतं. अपंग म्हणून रेल्वे प्रवासात सवलत मिळण्यासाठीचा पास काढण्यासाठी ते सकाळी ९ वाजता रूग्णालयात आले. त्यांना रेल्वे पासच्या अर्जावर जिल्हा शल्य चिकित्सकांचा सही, शिक्का पाहिजे होता. आता दुपारी ३ वाजत आले असताना ते निवासी वैद्यकीय अधिकाºयाच्या दालनासमोर भेटले. ६ तासात त्यांना ना जिल्हा शल्य चिकित्सक भेटले. ना निवासी वैद्यकीय अधिकारी.प्राजक्ता कैलास वीरकर. ९ वर्षांची चिमुरडी. जन्मापासूनच मतीमंद. तिचे वडील कैलास व आई हे मायबाप प्राजक्ताअपंग, मतिमंद असल्याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आले होते. सोनई (ता. नेवासा) येथील धनगरवाडीहून ते सकाळी साडे नऊला इथं पोहोचले. एक नंबरला केसपेपर घेतला. तिथून त्यांना २७ नंबरला पाठवलं. इथं त्यांना कोणीच आत घेतलं नाही. तिथून त्यांना पुन्हा ३३ नंबरला पाठवलं. तिथून परत ४ नंबरला पिटाळलं. तिथून ते कागदपत्राच्या झेरॉक्स आणायला म्हणून बाहेर गेले. झेरॉक्स काढून परत येईपर्यंत ३३ नंबरमधले डॉक्टर गायब झाले होते.रणजीत बाबासाहेब आव्हाड (रा. जांभळी, ता. पाथर्डी) हा युवक सकाळी ९ वाजता वडिलांना जांभळीहून घेऊन ‘सिव्हील’मध्ये पोहोचला. वडिलांना ऐकायला येत नाही. त्यामुळे कर्णबधिर असल्याचं प्रमाणपत्र घ्यायला तो वडिलांना घेऊन आला होता. केसपेपर काढून तो बराच वेळ एका कक्षाबाहेर बसला. बराच वेळ काहीच हालचाल दिसेना, म्हणून त्याने तिथल्या पांढºया साडीतल्या मावशींना विचारलं, ‘मावशी इथं पेशंटचे नंबर हायेत का न्हायी.’ तेव्हा ती मावशी त्याच्यावर डाफरतच म्हणाली ,‘नंबर फिंबर इथं नसतो. तुला थांबायचं तर नाही, तर निघून जा.’ आपल्यालाच गरज आहे म्हणून रणजीत वडिलांना घेऊन थांबला.पण मावशीच्या उत्तराने, त्यांनी दिलेल्या उद्धटपणाच्या वागणुकीने तो आतल्या आत धुमसतच होता. पण नाईलाज होता. अपमान, मानहानी होऊनही तो निवासी वैद्यकीय अधिकाºयांची वाट पाहत होता. सिस्टरने उद्धट भाषा वापरल्याची तक्रार करीत इथं येणाºयांशी इथले कर्मचारी हे असे वागतात. यांना माणुसकी पण नाही. सकाळी ११ पासून इथं आहे. पण कोणी नीट बोलत नाही. एकही डॉक्टर, अधिकारी जागेवर भेटत नाही. भेटला तरी तुसडेपणाने बोलतात,तो सांगत होता.नानासाहेब बाळकृष्ण पाटील. पायाने अपंग. रेल्वे पाससाठी सकाळी १० वाजेपासून आलेला. सकाळपासून ४ नंबरसमोर बसून होता. बबन काकासाहेब देशमुख (वय ४०)आदिवासी प्रवण अकोले तालुक्यातील औरंगपूरहून सकाळी १० वाजता जुन्या कार्डच्या नुतनीकरणासाठी आले होते. पोलिओमुळे अपंगत्व आलेलं. केसपेपर काढून ४ नंबरला गेलो. तिथून २७ नंबरला जायला सांगितलं. तिथून परत ४ नंबरला जायला सांगितलं. तिथून ५२ नंबरला पाठवलं. दुपारी ३ नंतर निवासी वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षातून एक जण केसपेपर,प्रमाणपत्रांचा गठ्ठा घेऊन दरवाजातून बाहेर डोकावत होता. मधूनच नीट बसा, रांग लावा. आम्ही कामं करायचे का नाही? म्हणत बाहेरच्या अपंगांवर ओरडत होता. त्याचा फोटो काढत असल्याचं दिसताच तो लगेच दरवाजातून आत पळाला.श्रीरामपूर तालुका अंपग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पी. बी. बोरूटे यांना मोबाईलवरून ‘सिव्हील’मधील आँखो देखा हाल सांगितला. त्यांनी हो...हो...पहातो, गाडेंना सांगतो. गाडेपण तिथं नाहीत का? म्हणून मोबाईल बंद केला. त्यांच्याशी ‘लोकमत’ने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आम्हाला सौजन्याने, प्रेमाने, माणुसकीची वागणूक द्या, एवढंच या अपंगांचं म्हणणं आहे. पण ‘सिव्हील’चा बुधवार म्हटलं की तुसडेपणा, अरेरावी, क्षणोक्षणी अपमान, हेटाळणी असा अनुभव घेत बुधवार म्हटलं की या अपंगांचा हा छळवारच ठरतोय.