शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या जागेवरुन पवार-विखे संघर्ष पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 12:39 IST

विखे यांना आम्ही पराभूत केल्याचा इतिहास राज्याला माहित आहे हा दाखला देत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरच्या जुन्या राजकारणाला पुन्हा फोडणी दिली आहे.

सुधीर लंके अहमदनगर : विखे यांना आम्ही पराभूत केल्याचा इतिहास राज्याला माहित आहे हा दाखला देत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरच्या जुन्या राजकारणाला पुन्हा फोडणी दिली आहे.पवारांच्या या विधानामुळे कॉंग्रेस आघाडीत प्रमुख असलेले पवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यातच राज्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय यांची या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी करण्याची इच्छा होती. मात्र, राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय भाजपच्या वाटेवर आहेत. विखे तुल्यबळ असताना त्यांनामतदारसंघ का सोडला जात नाही? असा प्रश्न पवार यांना पुण्यात पत्रकारांनी केला असता ‘दिवंगत बाळासाहेब विखे यांना आम्हीच या मतदारसंघातून पराभूत केलेहोते’ असा जुना संदर्भ पवार यांनी दिला.१९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे यांना पराभूत केले होते. मात्र, पवार व गडाख यांनी प्रचारात आपले चारित्र्यहनन केले असा आरोप करत विखे यांनी उच्च न्यायालयात खटला भरला होता. त्यात पवार सुरुवातीला अडचणीत आले होते. ही सल पवार यांच्या मनात आजही कायम असल्याचे त्यांच्या वरील विधानातून स्पष्ट झाले.‘झाले गेले विसरुन जाऊ. सुजय तुमचा नातू आहे’, असे आवाहन राधाकृष्ण विखे यांनी पवारांना केले होते. मात्र, त्यानंतरही पवार आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात. त्यामुळे आता या दोन नेत्यांतच संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम आघाडीवरही होऊशकतो.दोन दिवस थांबा-गडाखप्रशांत गडाख यांची भूमिका समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, दोन दिवस थांबा सर्व चित्र स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. गडाख यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय उत्सुकता वाढली आहे.पुन्हा विखे-गडाख लढतसुजय विखे भाजपमध्ये गेल्यास माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यातून मतदारसंघातील विखे-गडाख खटल्यातील जुने संदर्भ पुन्हा जागे होतील. राष्टÑवादीचे आमदार अरुण जगताप यांचेही नाव चर्चेत आहेत. गडाख किंवा जगताप हेच नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.विरोधी पक्षनेते पदाबाबत प्रश्नचिन्हसुजय विखे हे मंगळवारी भाजप प्रवेश करत आहेत. दुसरीकडे त्यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसच्या उमेदवार छाननी समितीत सदस्य आहेत. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे यांच्या विरोधी पक्षनेते पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. राष्टÑवादी व काँग्रेसचे नेतेही याबाबत आक्षेप घेण्याची शक्यता वर्तवली जाते. विखे स्वत:ही राजीनामा देऊ शकतात.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर