शिर्डी : सार्इंच्या रुग्णसेवेचा वसा पुढे चालवणाऱ्या व पंचक्रोशीतील रुग्णांसाठी संजीवनी असलेल्या साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाला पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही संस्थानच्या रुग्णालयाचे नूतन वैद्यकीय अधीक्षक डॉ़ विजय पाटील यांनी दिली़ संस्थानची त्रिसदस्यीय समिती व प्रशासनाने टाकलेल्या विश्वासास पात्र राहून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कारभारात सुसुत्रता आणून नावलौकिकात आणखी भर पाडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी डॉ़पाटील यांनी सांगितले़ साईबाबा रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा नुकताच सत्कार समारंभ झाला़ यावेळी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्याहस्ते डॉ़ पाटील यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, दिलीप उगले, उत्तम गोंदकर, अशोक औटी, कार्डीओलॉजीस्ट डॉ. मनोहर शिंदे,अतिदक्षता विभागप्रमुख डॉ.दीपक कांदळकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी अशोक वाळुंज, रुग्णालय प्रशासक डॉ. मैथिली पितांबरे, मेट्रन मंदा थोरात, राजीव गांधी योजनेचे समन्वय डॉ. प्रीतम वडगावे, रुग्णालयाचे खरेदी अधिकारी कुणाल आभाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दीपक कांदळकर तर आभार तुषार शेळके यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
साईबाबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी पाटील
By admin | Updated: January 12, 2016 23:34 IST