अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी २१९१ कोरोना रुग्णांची वाढ झाली. नगर शहर, भिंगार शहरात रुग्ण कमी झाले असून श्रीरामपूर आणि पाथर्डीत रुग्ण संख्या वाढली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी २१९८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३४ हजार ६६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत २१९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५ हजार ४०२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५६५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८११ आणि अँटिजन चाचणीत ८१५ रुग्ण बाधित आढळले. दरम्यान, २४ तासांत ३३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर करण्यात आली आहे.
---------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या :२,३४,६६५
उपचार सुरू असलेले रूग्ण : १५४०२
मृत्यू : २९०३
एकूण रुग्ण संख्या : २,५२,९७०