शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

पथदिवे घोटाळा : सातपुते लपला होता नरसोबाच्या वाडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:40 IST

महापालिका पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार रोहिदास सातपुते हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिने फरार होता. या काळात तो कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी येथे लपून बसला होता.

अहमदनगर: महापालिका पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार रोहिदास सातपुते हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिने फरार होता. या काळात तो कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी येथे लपून बसला होता. तोफखाना पोलीस ठाण्याचे एक पथक शुक्रवारी सातपुतेला घेऊन नरसोबावाडी येथे गेले आहे. सातपुते नरसोबावाडीत नेमका कुठले लपला होता, तेथे त्याच्या संपर्कात कोण होते आदींबाबत पोलीस माहिती घेणार आहेत.सातपुते याच्या विरोधात जिल्हा न्यायालयाने स्टॅडिंग वॉरंट काढल्यानंतर तो २० मे रोजी पोलीसांना शरण आला. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलीसांच्या चौकशीला सातपुते प्रतिसाद देत नाही. महापालिकेतील पथदिवे घोटाळ्याच्या आठरा फाईल सातपुते यानेच गायब केल्याच्या पोलीसांना संशय आहे. सातपुते मात्र ठेकेदार सचिन लोटके याच्याकडे बोट दाखवित आहे. पोलीसांनी मात्र सातपुते विरोधात महत्त्वाचे पुरावे एकत्र केले आहेत. दरम्यान पोलीसांनी महापालिकेत संगनमताने ३४ लाख ६५ हजार ४४१ रुपयांचा पथदिवे घोटाळा केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात निलंबित लिपिक भरत त्रिंबक काळे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता उर्वरित आरोपी रोहिदास सातपुते, विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे, ठेकेदार सचिन लोटके, उपायुक्त विक्रम दराडे व मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे आदींविरोधात लवकरच पुरवणी दोषारोेपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाahmednagar policeअहमदनगर पोलीस