शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी तालुका : वॉटर कप स्पर्धेतील १६ गावांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:29 IST

भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी पॉकलेन व जे.सी.बी. मशीन पुरविण्यात आली. या माध्यमातून तालुक्यातील सोळा गावांमध्ये १ अब्ज, ३५ कोटी, ८२ लाख ५० हजार लीटर पाणी साठा होणार आहे. त्यामुळे आता या सोळा गावांना पावसाची प्रतीक्षा आहे.

पाथर्डी : भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी पॉकलेन व जे.सी.बी. मशीन पुरविण्यात आली. या माध्यमातून तालुक्यातील सोळा गावांमध्ये १ अब्ज, ३५ कोटी, ८२ लाख ५० हजार लीटर पाणी साठा होणार आहे. त्यामुळे आता या सोळा गावांना पावसाची प्रतीक्षा आहे.अभिनेता अमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४२ गावांची निवड झाली. त्यापैकी १६ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. ही कामे करतांना पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पाथर्डी तालुक्याची निवड झाली. तालुक्यातील ४२ गावे यामध्ये सहभागी झाली. ४२ गावांमध्ये श्रमदान सुरू झाले. त्यापैकी १६ गावांनी श्रमदानाचे १५ गुण पूर्ण केले. या गावांना पॉकलेन व जे.सी.बी. मशिन भारतीय जैन संघटना, पाथर्डी यांच्यामार्फत पुरविण्यात आले. नदी, बंधारे, पाझर तलावाचे रूंदीकरण, खोलीकरण, दुरूस्ती डोंगरतळ्यावर चर खोदणे, शेततळे इत्यादी कामातून पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक बंडू ढगे, भारतीय जैन संघटनेचे तालुका प्रकल्प संचालक विश्वजित गुगळे व त्यांचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन संयुक्तरित्या फिरले. सरपंच, गावकऱ्यांशी संपर्क साधून श्रमदान तसेच मशीन कामाविषयी जनजागृती केली.भारतीय जैन संघटनेतर्फे भिलवडे, चिचोंडी, पिंपळगांव टप्पा, जोगेवाडी, मोहरी, माळेगांव, पागोरीपिंपळगाव, भालगाव, मुंगुसवाडे, पारेवाडी, वसूजळगाव, करोडी, देवराई, मिरी, आगसखांड, खेर्डे आदी गावात जलसंधारणाची कामे झाली आहेत.पाथर्डी तालुक्यात भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वाखाली जलसंघारणाचे काम पूर्ण केले आहे. २२६३७ तास पॉकलेन व जे.सी.बी.चालविण्यात आला आहे. त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता वाढली असून सोळा गावे पाणीदार होणार आहेत. याचा आदर्श घेऊन पुढील वर्षी अन्य गावे यामध्ये सहभागी होतील असा विश्वास आहे.-विश्वजित गुगळे, तालुका प्रकल्प संचालक, भारतीय जैन संघटना

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी