शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी पालिकेचा ‘तो’ मद्यधुंद स्वच्छता निरीक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:10 IST

कार्यालयीन कामकाजाच्या वेळी दारू पिऊन कर्मचा-यांना व नागरिकांना अरेरावी केल्याप्रकरणी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे.

पाथर्डी : कार्यालयीन कामकाजाच्या वेळी दारू पिऊन कर्मचा-यांना व नागरिकांना अरेरावी केल्याप्रकरणी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड हे सोमवारी दुपारी पालिका कार्यालयात गेले होते. या माहितीशी संबंधित पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना याबाबत विचारणा केली असता ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे किसन आव्हाड यांच्या लक्षात आले. त्यांनी सदर प्रकार हा कार्यालय निरीक्षक आयुब सय्यद यांना यांचे निदर्शनास आणून दिला. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना फोनवरून स्वच्छता निरीक्षक मद्यधुंद स्वच्छता निरीक्षकावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार ढवळे यांची इतर कर्मचाºयांनी खात्री केली असता ते मद्यधुंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याकामी पाथर्डी पोलिसांना पत्र देण्यात आले. परंतु सदरील प्रकाराचे गांभीर्य लक्षात येताच काही पालिकेतील कर्मचा-यांनी स्वच्छता निरीक्षक ढवळे यांना पालिकेतून पळून जाण्याचा सल्ला दिला. काही वेळान पोलीस आल्यानंतर दत्तात्रय ढवळे कार्यालयात आढळून आले नाहीत. त्यांना फोनवर संपर्क केला असता त्यांचा फोन बंद आढळून आला. पोलिसांनी ढवळे यांचा शोध घेतला, परंतु ढवळे आढळून न आल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करता आली नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. त्याच अनुषंगाने मंगळवारी मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर यांनी स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना निलंबित करीत असल्याबाबतचा आदेश काढला आहे.

टॅग्स :Pathardiपाथर्डीAhmednagarअहमदनगर