सदर समितीच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पथविक्रेता सर्वेक्षण यादीतील लाभार्थ्यांना ऑलाइन पद्धतीने अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याच्या आधार कार्डसोबत त्याचा मोबाईल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे. काही पात्र लाभार्थी आधार कार्ड बऱ्याच दिवसांपासून वापरात नसल्याने लाभार्थ्यांना अर्ज करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड वापर अद्ययावत करून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा, असे कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आवाहन केले आहे.
पथविक्रेत्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा
By | Updated: December 5, 2020 04:37 IST