अहमदनगर : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका राजकीय नेत्याच्या सभेत सक्रिय सहभाग घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली़तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले व नियंत्रण कक्षातील कॉन्स्टेबल नामदेव रोहोकले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ दीपक व नामदेव हे राजकीय नेत्यांच्या सभेत सक्रिय सहभागी होत होते़ सहा महिन्यांपुर्वी झालेल्या एका सभेत दोघांनीही सक्रिय सहभाग घेतला होता.
राजकीय नेत्याच्या सभेत सहभाग : दोन पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:26 IST